विराट कोहली ठरला हा विक्रम करणारा पहिला खेळाडू

टी20 वर्ल्डकप मॅच मध्ये पाकिस्तान विरोधात टीम इंडियाचा उपकर्णधार विराट कोहलीने ५० रन केले आणि अंतराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये सगळ्यात अधिक अर्धशतक ठोकणारा खेळाडू तो ठरला.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Mar 20, 2016, 06:40 PM IST
विराट कोहली ठरला हा विक्रम करणारा पहिला खेळाडू title=

कोलकाता : टी20 वर्ल्डकप मॅच मध्ये पाकिस्तान विरोधात टीम इंडियाचा उपकर्णधार विराट कोहलीने ५० रन केले आणि अंतराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये सगळ्यात अधिक अर्धशतक ठोकणारा खेळाडू तो ठरला.

कोहलीने न्यूजीलंडच्या ब्रेंडन मैक्यूलमला मागे टाकत सर्वाधिक अर्धशतक केले. फक्त ४० मॅचमध्ये त्याने हा कारनामा करुन दाखवला. कोहलीने १४४१ रन बनवत १४ अर्धशतक ठोकले आहेत.

शनिवारी झालेल्या भारत-पाकिस्तान सामना विराटच्या अर्धशतकीय खेळी मुळे भारताने जिंकला. यामुळे आता पुढील सामने जिंकण्यासाठी भारतीय संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल.