'तेंडुलकरपेक्षा विराट सर्वोत्तम' - सौरव गांगुली

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यात तुलना केली आहे, यावर बोलतांना सौरव गांगुली म्हणाला, सचिन तेंडुलकर सर्वोत्तम क्रिकेटपटू असला तरी, ऑस्ट्रेलियामध्ये सचिन तेंडुलकरपेक्षा विराट कोहली सर्वोत्तम खेळ करतो.

Updated: Jan 21, 2016, 04:06 PM IST
'तेंडुलकरपेक्षा विराट सर्वोत्तम'  - सौरव गांगुली title=

मुंबई : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यात तुलना केली आहे, यावर बोलतांना सौरव गांगुली म्हणाला, सचिन तेंडुलकर सर्वोत्तम क्रिकेटपटू असला तरी, ऑस्ट्रेलियामध्ये सचिन तेंडुलकरपेक्षा विराट कोहली सर्वोत्तम खेळ करतो.

सचिन तेंडुलकर, व्ही.व्ही.एस लक्ष्मण पण या सगळयांमध्ये कोहली सर्वोत्तम आहे. ऑस्ट्रेलियात विराटच्या कामगिरीत दिवसागणिक अधिकाधिक सुधारणा होत आहे असे सौरवने सांगितले. 

सौरव गांगुली म्हणाला, ऑस्ट्रेलियात दौऱ्यात भारतासाठी काही सकारात्मक असेल तर तो आहे विराट कोहली. ऑस्ट्रेलिया दौ-यातील एकदिवसीय मालिकेत विराटने ९३.२५ च्या सरासरीने सर्वाधिक ३७३ धावा केल्या आहेत. पहिल्या सामन्यात ९१, दुसऱ्या सामन्यात ५९, तिसऱ्या सामन्यात ११७ आणि चौथ्या सामन्यात १०६ धावांची खेळी केली.