अखेर विराट कोहलीने दिली प्रेमाची कबुली...

क्रिकेटपटू विराट कोहलीनं अभिनेत्री अनुष्का शर्मावरील प्रेमाची कबुली दिली आहे. जे आहे ते सर्वांना माहिती आहे, असं तो म्हणाला.

Updated: Nov 21, 2014, 11:16 AM IST
अखेर विराट कोहलीने दिली प्रेमाची कबुली... title=

मुंबई : क्रिकेटपटू विराट कोहलीनं अभिनेत्री अनुष्का शर्मावरील प्रेमाची कबुली दिली आहे. जे आहे ते सर्वांना माहिती आहे, असं तो म्हणाला.

आम्ही कोणतीही गोष्ट लपवू इच्छीत नाहीत. या गोष्टीला चर्चेचा विषय बनवणं हे अयोग्य आहे. जर आम्हाला एकत्र पाहीलय तर अशा गोष्टी विचारणं कितपत योग्य आहे. हे आमचं खासगी आयुष्य आहे. त्याचा सर्वांनी सन्मान करायला हवा, असं विराट म्हणालाय. 

याआधी विराटने क्रिकेटच्या मैदानावर बॅटच्या माध्यमातून flying kiss दिला होता. त्यावेळी त्याच्या प्रेमाची जाहीर कबुली मिळाली होती. आता तर मुंबई विमानतळावर दोघांनी मीडियासमोर हात उंचावून प्रेम असल्याचे दाखवून दिले. यावेळी त्याने जे आहे ते सर्वांना माहित असल्याचे म्हटले.

दरम्यान, लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनीही या दोघांच्या प्रेमाला पाठिंबा दर्शविला आहे. प्रत्येकाचे रिलॅक्स होण्याचा फंडा आहे. जर प्रेम करुन जर रन्स काढत असेल तर त्यात गैर काय, असा सवाल गावस्कर यांनी उपस्थित केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.