विराट कोहलीला १२ लाखांचा दंड

रॉयल चॅलेंजिंग बंगळूरुचा कर्णधार विराट कोहलीला रायझिंग पुणे सुपरजायंटविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हररेटकरिता तब्बल १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय.

Updated: Apr 23, 2016, 02:58 PM IST
विराट कोहलीला १२ लाखांचा दंड title=

पुणे : रॉयल चॅलेंजिंग बंगळूरुचा कर्णधार विराट कोहलीला रायझिंग पुणे सुपरजायंटविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हररेटकरिता तब्बल १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय.

स्लो ओव्हररेटकरिता विराट कोहलीला आयपीएलच्या नियमानुसार १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आल्याचे आयपीएलने परिपत्रकातून स्पष्ट केले. 

पुण्याविरुद्धच्या शुक्रवारच्या सामन्यात कोहली आणि एबीडे विलियर्स यांच्या शतकी खेळीच्या जोरावर बंगळूरुने १३ धावांनी विजय मिळवला. कोहलीने ६३ चेंडूत ८० तर विलियर्सने ४६ चेंडूत ८३ धावा केल्या.