एकाच संघात असून विराट करतो क्रिस गेलचा तिरस्कार!

टी २० वर्ल्ड कपचा मॅन ऑफ द टूर्नामेंट आणि टीम इंडियाचा आक्रमक क्रिकेटर विराट कोहली यांनं अनेकांना धक्काच दिला... जेव्हा त्यानं म्हटलं की तो क्रिस गेलचा द्वेष करतो...

Updated: Apr 9, 2016, 11:10 AM IST
एकाच संघात असून विराट करतो क्रिस गेलचा तिरस्कार! title=

नवी दिल्ली : टी २० वर्ल्ड कपचा मॅन ऑफ द टूर्नामेंट आणि टीम इंडियाचा आक्रमक क्रिकेटर विराट कोहली यांनं अनेकांना धक्काच दिला... जेव्हा त्यानं म्हटलं की तो क्रिस गेलचा द्वेष करतो...

होय, सगळ्यांच्या समोर विराटनं हे कबूल केलंय. पण, विराटनं हे मजेशीर अंदाजात म्हटलंय हे महत्त्वाचं... 

आयपीएल फ्रेंचायजी टीम 'रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू' (RCB)मध्ये विराट आणि क्रिस दोघंही आहेत. एकाच टीममध्ये असून विराट असं कसं काय जाहीररित्या म्हणू शकतो, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल... 

विराटनंच तुमच्या या प्रश्नाचंही उत्तर दिलंय. आरसीबीच्या जर्सी लॉन्चिंग दरम्यान विराटनं आपण क्रिस गेलचा तिरस्कार करतो कारण, क्रिसच्या टीमनं टी-२० च्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाला हरवलं... असं म्हटलंय.  

मजेशीर अंदाजात विराटनं नंतर हेही स्पष्ट केलं की, आपल्या पराभवानंतर फायनलमध्ये वेस्ट इंडिजनच बाजी मारावी अशीच आम्ही प्रार्थना केली.

टी २० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडिजनं टीम इंडियाला ७ विकेटनं हरवून बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यानंतर फायनलमध्ये बाजी मारत वेस्ट इंडिजची टीम विश्वविजेता बनलीय.