'विराट कोहली म्हणजे खेळ जगतातला डोनाल्ड ट्रम्प'

'डीआरएस' प्रकरणानंतर सुरू झालेला भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा वाद मैदानाबाहेरही सुरूच आहे. दोन्ही टीम्स एकमेकांची उणे-दुणे काढण्यात मग्न आहेत. आता तर ऑस्ट्रेलियन मीडियानंही या वादात तोंड घातलंय. त्यांनी विराट कोहली म्हणजे खेळ जगतातला 'डोनाल्ड ट्रम्प' असल्याचं घोषित करून टाकलंय. 

Updated: Mar 21, 2017, 10:35 PM IST
'विराट कोहली म्हणजे खेळ जगतातला डोनाल्ड ट्रम्प'

मुंबई : 'डीआरएस' प्रकरणानंतर सुरू झालेला भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा वाद मैदानाबाहेरही सुरूच आहे. दोन्ही टीम्स एकमेकांची उणे-दुणे काढण्यात मग्न आहेत. आता तर ऑस्ट्रेलियन मीडियानंही या वादात तोंड घातलंय. त्यांनी विराट कोहली म्हणजे खेळ जगतातला 'डोनाल्ड ट्रम्प' असल्याचं घोषित करून टाकलंय. 

ऑस्ट्रेलियानं कोहलीची तुलना अमेरिकेचे वादग्रस्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केलीय. 'द टेलिग्राफ'मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार, विराट कोहली स्पोर्टस जगतातला डोनाल्ड ट्रम्प बनलाय. ट्रम्प यांच्याप्रमाणेच कोहलीनंही मीडियाला प्रत्येक गोष्टीसाठी दोषी ठरवणं सुरू केलंय.

दरम्यान, ऑस्ट्रेलियन मीडिया म्हणजे ऑस्ट्रेलियन टीमचा सपोर्टिंग स्टाफ असल्याचं म्हणत त्यांनी गंभीरतेनं घेण्याची आवश्यकता नाही, असं टीम इंडियाचे माजी कॅप्टन सुनील गावसकर यांनी म्हटलंय.