टेनिसच्या सम्राटाची 'विराट' भेट!

रॉजर फेडररची फॅन फॉलोईंग संपुर्ण जगभरात आहे. याला अपवाद भारतीय क्रिकेट टीमचे क्रिकेटर्सही राहिलेले नाही. 

Updated: Jan 13, 2015, 11:40 AM IST

मुंबई : रॉजर फेडररची फॅन फॉलोईंग संपुर्ण जगभरात आहे. याला अपवाद भारतीय क्रिकेट टीमचे क्रिकेटर्सही राहिलेले नाही. 

टेनिसच्या दुनियेचा अनभिषिक्त सम्राट आणि क्रिकेट जगताचा सुपरस्टार कोहली यांच्या विराट भेटीची चर्चा सध्या सोशल नेटवर्किंग साईटवर चांगलीच रंगतेय. विराटनं फेडररची भेट घेतल्यानंतर आपला फोटो ट्विटरवर पोस्ट केलाय. त्याचप्रमाणे टेनिसच्या सम्राटाची ही भेट मी कधीही विसरणार नाही असंही त्यानं म्हटलंय. 

कोहलीप्रमाणे टीम इंडियाची नवी रन मशिन अजिंक्य रहाणेनही फेडरर भेटीचा फोटो सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केलाय. 

दरम्यान, विराट कोहलीचा आयडल असलेला सचिन तेंडुलकर विम्बल्डनला कायमच उपस्थिती लावतो. सचिन टेनिसप्रेमी आहेच. फेडरर आणि सचिन विम्बल्डनदरम्यान कायमच भेटतात. सचिनही फेडेक्सचा फॅन आहे. त्याचप्रमाणे फेडररलाही सचिन आवडतो. या दोघांची मैत्री क्रीडाविश्वात सर्वश्रुत आहे. आता विराटनंही आपलं फेडररप्रेम त्याच्या चाहत्यांसमोर आणलंय. त्यामुळे ही भेट दोघांच्याही चाहत्यांसाठी एक अविस्मरणीय क्षण ठरलाय असं म्हटलं तर काहीच वावग ठरणार नाही.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.