विराट आणि रवी भाईंमुळे जाणवलं माझी गरज आहे: हरभजन सिंह

जवळपास दोन वर्ष टीममधून बाहेर राहिल्यानंतर आतंरराष्ट्रीय टीममध्ये परतलेल्या हरभजन सिंहनं विराट कोहली आणि टीम संचालक रवी शास्त्रींची खूप स्तुती केलीय. या दोघांमुळे मला जाणवलं की, माझी टीमला गरज आहे, असं भज्जी म्हणाला.

PTI | Updated: Jul 21, 2015, 07:10 PM IST
विराट आणि रवी भाईंमुळे जाणवलं माझी गरज आहे: हरभजन सिंह title=

नवी दिल्ली: जवळपास दोन वर्ष टीममधून बाहेर राहिल्यानंतर आतंरराष्ट्रीय टीममध्ये परतलेल्या हरभजन सिंहनं विराट कोहली आणि टीम संचालक रवी शास्त्रींची खूप स्तुती केलीय. या दोघांमुळे मला जाणवलं की, माझी टीमला गरज आहे, असं भज्जी म्हणाला.

हरभजनला पहिले बांगलादेश विरुद्ध एका टेस्ट मॅचसाठी निवडण्यात आलं होतं. त्यानंतर त्यानं झिम्बाव्वे दौऱ्यात वनडेत कमबॅक केलं. बांगलादेश दौऱ्यात ड्रेसिंग रूममधील बदललेल्या वातावरणाबद्दल स्पिनर भज्जी म्हणाला की, कोहली आणि शास्त्रीमुळे मी नॉर्मल विचार करू शकलो. 

जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये गेलो आणि इकडे-तिकडे सर्व नवे चेहरे होते. तेव्हा पाहून बरं वाटलं की, टीममध्ये इतके नवे खेळाडू आहेत आणि मी त्याचा भाग आहे. हरभजननं सांगितलं, ड्रेसिंग रूममध्ये आमचं ब्रिफिंग झालं आणि विराटनं टीमला संबोधित केलं तेव्हा माझा उल्लेख केला. आम्हाला वाटतं २० विकेट घेण्यात आपण मदत कराल. आपलं लक्ष्य प्रत्येक टेस्ट मॅच जिंकणं आहे. आपला अनुभव आणि कौशल्याच्या बळावर इतर बॉलर्सना मदत होईल, असं विराटनं म्हटलं होतं. 

बीसीसीआय टिव्हीला भज्जी म्हणाला, रवी भाई यांनीही माझी स्तुती केली आणि माझं मनोधैर्य वाढवलं. यामुळं मला वाटलं टीमला माझी गरज आहे आणि सर्वकाही दोन वर्षांपूर्वीसारखंच सामान्य झालंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.