विराटने पाहिला अनुष्काचा NH10,म्हणाला अनुष्कावर गर्व आहे

Updated: Mar 17, 2015, 08:12 PM IST
विराटने पाहिला अनुष्काचा NH10,म्हणाला अनुष्कावर गर्व आहे title=

मेलबर्न :  क्रिकेट वर्ल्ड कप २०१५ मध्ये पाकिस्तान विरूद्ध चौकार आणि षटकार लगावून शतक झळकाविणाऱ्या विराट कोहलीने त्याची गर्लफ्रेंड अनुष्का शर्माचा चित्रपट NH10 हा चित्रपट वेळ काढून पाहिला. विराटने या चित्रपटाची ट्विटवर खूप प्रशंसा केली आहे. 

 

 

विराटने आपल्या ट्विटर हँडलवर ट्वीट केल की, NH10 हा चित्रपट पाहिला. चित्रपट पाहून मंत्रमुग्ध झालो आहे. काय शानदार चित्रपट आहे. खासकरून माय लव अनुष्काचा परफॉर्मन्स पाहून खूप खूश आहे. मला तिचा गर्व वाटतो. अनुष्का शर्माने या चित्रपटात खूप चांगलं काम केलं आहे. 

बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्माच्या NH10 या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात १३.३० कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या दिवशी कमी कमाई करणाऱ्या या चित्रपटाने आठवड्याच्या शेवटी चांगली कमाई केली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.