फेडरर- जोकोविचची मॅच पाहायला विराट-युवी

 ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाचा दुसरा टी-20 सामना शुक्रवारी मेलबोर्नमध्ये होणार आहे. पण त्याआधी विराट कोहली आणि युवराज सिंग मेलबोर्नमध्येच सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमी फायनलचा आनंद घेताना दिसले. या मॅचचे फोटोही विराट कोहलीनं ट्विटरवर शेअर केले आहेत.  

Updated: Jan 28, 2016, 06:41 PM IST
फेडरर- जोकोविचची मॅच पाहायला विराट-युवी  title=

मेलबोर्न :  ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाचा दुसरा टी-20 सामना शुक्रवारी मेलबोर्नमध्ये होणार आहे. पण त्याआधी विराट कोहली आणि युवराज सिंग मेलबोर्नमध्येच सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमी फायनलचा आनंद घेताना दिसले. या मॅचचे फोटोही विराट कोहलीनं ट्विटरवर शेअर केले आहेत.  

जोकोविचचा फेडररला दणका

 

ऑस्ट्रेलियन ओपनच्या या सेमी फायनलमध्ये वर्ल्ड नंबर वन नोवाक जोकोविचनं रॉजर फेडररचा पराभव केला आहे. जोकोविचनं 6-1, 6-2, 3-6, 6-3 अशा सेट्समध्ये फेडररला हरवलं. सेमी फायनलमध्ये मिळवलेल्या या विजयामुळे जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये पोहोचलाय. त्यामुळे यंदाची ऑस्ट्रेलियन ओपनची फायनल जोकरची सहावी असेल. 

मेलबोर्नमध्ये झालेल्या या सेमी फायनलमध्ये जोकोविच पहिल्यापासूनच आघाडीवर होता. पहिल्या सेटमध्ये त्यानं  6-1 आणि 6-2 नं खिशात टाकला. पण त्यानंतर मात्र फेडररनं कमबॅक करत तिसरा सेट 6-3 नं जिंकला. पण चौथ्या सेटमध्ये मात्र पुन्हा तसाच करिश्मा फेडररला दाखवता आला नाही, आणि त्याचं ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये खेळायचं स्वप्न भंगलं.