साक्षीच्या विजयानंतर 'सेहवाग'चं 'शोभा डे'ला कडक उत्तर

रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकचा विजय झाल्याने रेसलिंगमध्ये भारताला पहिलं पदक मिळालं आहे. भारताला पहिलं मेडल मिळाल्याने सर्वांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

Updated: Aug 18, 2016, 05:20 PM IST
साक्षीच्या विजयानंतर 'सेहवाग'चं 'शोभा डे'ला कडक उत्तर title=

नवी दिल्ली : रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकचा विजय झाल्याने रेसलिंगमध्ये भारताला पहिलं पदक मिळालं आहे. भारताला पहिलं मेडल मिळाल्याने सर्वांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि वीरेंद्र सेहवागने मात्र यावेळी साक्षीच्या विजयाचा आनंद व्यक्त करताना, लेखिका शोभा डे यांना अनु्ल्लेखाने मारत टवीट केलं आहे.

सेहवाग साक्षीला शुभेच्छा देताना,  शोभा डेवर निशाणा साधला आहे. सहवागच्या या टवीटनंतर महानायक अमिताभ बच्चननेही त्याचं समर्थन केलं आहे.

सेहवागच्या या टवीटला लोकांनी खूप पसंत केलं आहे, मोठ्या प्रमाणात सहवागच्या टवीटला रिटवीट केलं आहे. तुम्हीही सेहवागच्या टवीटला मोठ्या प्रमाणात पसंत केलं आहे. तुम्ही देखील वीरूच्या टवीटला उत्तर द्या, अभिनेता अमिताभ बच्चन यांनी देखील प्रशंसा करायला चूकलेले नाहीत,  बिंग बी यांनी देखील आपला ह्यूमर सेन्स दाखवला आहे.

लेखिका शोभा डे आपल्या टवीटवरून वादात आल्या होत्या, शोभा डे यांनी टवीट केलं होतं, 'गोल ऑफ थीम इंडिया अॅट द ऑलिम्पिक : रिओ जाओ, सेल्फी लो, खाली हाथ वापस आओ. पैसे आणि संधीची ही कशी बर्बादी आहे'. आपल्या या टवीटनंतर सोशल मीडियावर शोभा निशाण्यावर आहे. शोभा यांच्या या टवीटरवर खूप टीका झाली होती.