विराट मोठ्या संधी टिपणारा खेळाडू - कॅप्टन कूल

विराट कोहली सध्याच्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये अपेक्षेप्रमाणे खेळी करून दाखवण्यास अपयशी ठरलाय. पण, टीम कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं मात्र कोहलीची पाठिराखण केलीय. 

Updated: Mar 20, 2015, 04:08 PM IST
विराट मोठ्या संधी टिपणारा खेळाडू - कॅप्टन कूल title=

सिडनी : विराट कोहली सध्याच्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये अपेक्षेप्रमाणे खेळी करून दाखवण्यास अपयशी ठरलाय. पण, टीम कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं मात्र कोहलीची पाठिराखण केलीय. 

विराट आगामी मॅचेसमध्ये आपल्या खेळाचं चांगलं प्रदर्शन करून दाखवू शकेल अशी आशा व्यक्त केलीय. कोहली हा 'मोठ्या संधी टिपणारा खेळाडू' आहे, असं धोनीनं म्हटलंय. 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट श्रृंखलेत चार मॅचमध्ये चार शतकं ठोकणाऱ्या कोहलीनं पाकिस्तान विरुद्ध वर्ल्डकपच्या पहिल्याच मॅचमध्ये शतक ठोकलं होतं. परंतु, यानंतर मात्र सहा वेळा त्यानं 46, नाबाद 33, 33, नाबाद 44, 38 आणि 3 रन्स दिलेत. 

विरोधी टीमच्या चांगल्या बॉलिंगपेक्षा खराब शॉट खेळण्यामुळे विराटचा फॉर्म खराब दिसतोय का? असा प्रश्न धोनीला विचारला गेला तेव्हा तो मात्र याच्याशी सहमत नव्हता. 

बांग्लादेशविरुद्धच्या मॅचमध्ये विजय मिळवल्यानंतर धोनी पत्रकारांशी संवाद साधत होता. 'खराब शॉट हे कारण मला पटत नाही. तो दबदबा निर्माण करणारा बॅटसमन आहे आणि त्याला त्याचे शॉटस् खेळणं जास्त आवडतं. मुला नाही वाटत की कोहलीची बॅटींग खराब होती' असं धोनीनं यावेळी म्हटलंय. 

विराटनं ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट श्रृंखलेत मात्र आपला चांगला फॉर्म टिकवून ठेवला होता. पण, क्रीजवर उतरून प्रत्येक वेळेसच तो चांगलं खेळेल अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे... असं धोनीनं म्हटलंय. 

'विराटनं प्रत्येक वेळेस शतक ठोकावं हे गरजेचं नाही. कदाचीत आपण टेस्ट श्रृंखलेशी जोडून पाहतोय आणि अपेक्षा करतोय की तो जेव्हा कधी क्रीजवर उतरेल तेव्हा शतक ठोकेल' असाही टोला धोनीनं हाणलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.