गाले : पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज युनूस खान श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक रन्स बनविणारा फलंदाज बनला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. युनूसने श्रीलंकेविरूद्ध खेळण्यात आलेल्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या डावात हा विक्रम केला.
पहिल्या डावात १७७ रन्सची खेळी खेळणारा युनूस दुसऱ्या डावात केवळ १३ रन्सवर बाद झाला. पण त्याने श्रीलंकेविरुद्ध एकूण १९९८ धावा काढल्या आणि तो तेंडुलकरपेक्षा तीन रन्स अधिक केले आहेत.
तेंडुलकरने श्रीलंकेविरूद्ध २५ टेस्ट मॅचमध्ये ६०.२५च्या सरासरीने १९९५ रन्स केले होते. यात नऊ शतकांचा समावेश आहे. युनूसने २५ टेस्ट मॅच खेळून ५२.५७ च्या सरासरीने सर्वाधिक १९९८ रन्स काढले. त्याने श्रीलंकेविरुद्ध सात शतक लगावले आहे. श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक रन्स बनविणाऱ्यांच्या यादीत इंझमाम उल हक १५५९ रन्ससह तिसऱ्या आणि राहुल द्रविड १५०८ धावांसह चौथ्या स्थानावर आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.