बिझनेसमन युवीची नवीन इनिंग!

टीम इंडिया २०११ वर्ल्डकपचा सर्वात मोठा स्टार आणि टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंग आता 'बिझनेस इनिंग' खेळायला सज्ज झालाय.

Updated: Apr 7, 2015, 01:43 PM IST
बिझनेसमन युवीची नवीन इनिंग! title=

नवी दिल्ली : टीम इंडिया २०११ वर्ल्डकपचा सर्वात मोठा स्टार आणि टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंग आता 'बिझनेस इनिंग' खेळायला सज्ज झालाय.

युवराज यूवीकॅन व्हेन्चर्ससोबत मिळून एक स्टार्टअप फंड सुरू करायच्या प्रयत्नात आहे. ज्या द्वारे तो तरुण उद्योजकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात मदत करेल. 

इतकंच नाही तर युवीनं आपल्या या फर्मद्वारे येत्या ३ ते ५ वर्षांत आपले ५० करोड रुपये यामध्येच गुंतवण्याचाही निर्णय घेतलाय. ई-कॉमर्सद्वारे तरुणांचं भविष्य आणखी चांगलं बनवण्यासाठी इथं अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात, असंही युवराजचं म्हणणं आहे.

आपला काहीतरी बिझनेस असावा असं गेल्या अनेक दिवसांपासून मनात होतं. ऑनलाईन जगानं आकर्षित केल्यानंतर आता याच क्षेत्रात गुंतवणूक करायचा निर्णय घेतलाय, असं युवीनं म्हटलंय. 

सध्या आपलं सारं लक्ष आयपीएलवर असलं तर भविष्यात काही तरी नवीनही करायचंय... खूप सारे बुद्धीमान लोक आहेत, ज्यांच्याकडे खूप काही आयडिया आहेत आणि YouWeCan व्हेन्चर्सची आमची टीमही खूप चांगली जमीलीय... याद्वारेच काही बदल घडवून आणायचेत, असंही युवी म्हणतोय.

आयपीएल सीझन ८च्या लिलावात सर्वात महागडा खेळा़डू ठरलेल्या युवराजसाठी आयपीएलचा हा सीझन महत्त्वाचा ठरणार आहे. क्रिकेटमध्ये धुमाकूळ उडवणारा युवीची ही नवीन इनिंग तेव्हढीच धमाकेदार ठरणार का? हे लवकरच कळेल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.