www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यात उच्च शिक्षणाचा बोजवारा उडलाय. एकिकडे राज्यात इंजिनिअरींग कॉलेजमध्ये हजारोच्या संख्येने जागा रिक्त आहेत तर दुसरीकडे राज्यचं तंत्र शिक्षण संचालनालयात संचालकासह 83 पदे रिक्त आहेत. अशातच उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्या कारभारवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे.
राज्यात इंजिनिअरींगच्या जवळपास 60 हजार जागा रिक्त
का राहत आहेत जागा रिक्त ?
तंत्र शिक्षण संचालनालयला 6 वर्षापासून संचालकच नाही
तंत्र शिक्षण संचालनालयाची 83 पदे रिक्त
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री करतायत तरी काय ?
राज्यात उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत सर्वत्र चर्चा होत असताना उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांनी खरं तर याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. मात्र, परिस्थिती याउलट आहे. राज्यातील अभियांत्रिकी, एमबीए, एमसीए, औषधनिर्माण शास्त्र या सगळ्या अभ्यासक्रमांचा कारभार सांभाळत असणा-या तंत्र शिक्षण संचालनालयाला कुणी वाली नाही.
या विभागाला गेल्या 6 वर्षापासून पुर्ण वेळ संचालक नाही.
सहसंचालकाची 10 पैकी 6 पदे रिक्त आहेत तर 5 पैकी 3 उपसंचालक नाहीत.
सहाय्यक संचालक तांत्रिक याची तब्बल 21 पदे रिक्त आहेत केवळ एकच सह. संचालक तिथे काम पाहत आहे.
सहसचिव मंडळाची 6 पदे रिकामी आहेत.
इतकच नाही तर अशा एकूण 83 पदे भरली जात नाहीयत.
त्यामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारणे तर दुरच राहिले पण आहे तीच कामे करण्यासाठी या विभागाकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. त्यामुळे अशा विभागाकडून राज्यातल्या शिक्षण सुधारण्याबाबत काय अपेक्षा ठेवणार ?
एकिकडे इंजिनिअरींग, एमबीएच्या हजारोच्या संख्येने जागा का रिक्त राहत आहेत याबाबत उपाययोजना केल्या जात आहेत. महाविद्यालय संचालक, शिक्षण तज्ञांच्या बैठका घेतल्या जात आहेत मात्र, नाचता येईना आंगण वाकडे अशी परिस्थिती तंत्र शिक्षण विभागाची झाल्याची दिसते. त्यामुळे स्व:त इंजिनिअर असलेले उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री याकडे लक्ष देणार का ? हे पाहणं महत्वाचं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.