www.24taas.com,न्यर्याक
बहुप्रतिक्षेत असलेला आयफोन ५ बाजारात दाखल झालाय. कमी जाडीचा आणि कमी वजनाचा असलेला हा स्मार्टफोन बुधवारी अॅपलनं बाजारात आणला. या आयफोनची जाडी फक्त ७.५मिली तर वजन फक्त११२ग्रॅम एवढं आहे.
गेल्या काही दिवसांपासून अॅपल आयफोनची नवी व्हर्जन बाजारात आणणार अशी चर्चा होती. त्यानुसार सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये काल सकाळी आयफोन ५ लॉन्च करण्यात आला.
या आयफोनची डिस्प्ले ४ इंचाची आहे. या आयफोनमध्ये एकाच वेळी अनेक ऐप्लीकेशन करता येणार आहेत. आपल्या प्रत्येक उत्पादनाद्वारे वैयक्तिक तंत्रव्यवहारामध्ये क्रांतीकारी बदल घडविण्याचा शिरस्ता पाळणारे ‘अॅपल’ आपल्या पोतडीतील नवी जादू काढण्यास सज्ज असल्याच्या बातम्या होत्या.
गेल्या दोन दिवसात इंटरनेटच्या विश्वात या बातम्या चर्चेत होत्या. त्याचवेळेस पाच या आकडय़ाची छाया असलेले निमंत्रण अॅनपलने पत्रकारांपर्यंत पोहोचविले. आणि हे नवे उत्पादन म्हणजे दुसरेतिसरे काहीही नसून ‘आयफोन ५’च आहे, अशी शक्यता व्यक्त होऊ लागली.
बुधवारी सकाळी सॅनफ्रान्सिस्को येथे अॅपलने या निमंत्रणावरचा उत्सुकतेचा पडदा दूर करत ‘आयफोन ५’ जगासमोर सादर केला. मोठ्या आकाराचा ४ इंची डिस्प्ले ज्याचे रिझोल्युशन ११३० गुणिले ६४० एवढे चांगले आहे. त्यामुळे यापूर्वी अॅपलने आणलेले रेटिना डिस्प्लेचे सुस्पष्टतेचे तंत्रज्ञान अधिक चांगल्या पद्धतीने यावर अनु भवता येणार आहे. हा ‘आयफोन ५’ फोरजी एलटीइ नेटवर्कवर चालणारा आहे.