www.24taas.com,झी मीडिया,लंडन
आता दृष्टीहीन व्यक्तीही जग बघू शकतील... मात्र, डोळ्यांनी नव्हे तर कानांनी... होय हे खरंच ही किमया घडून येणार आहे, असा दावा शास्त्रज्ञांनी केलाय. दृष्टीहीन व्यक्तींना डोळ्यांनी पाहता आलं नाही तरी कानांनी त्यांना पाहता येऊ शकेल असं उपकरण बनविल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केलाय.
सेन्सरवर चालणारे हे उपकरण मेंदूला प्रशिक्षण देईल, ज्यामुळे एखाद्या वस्तूचं नाव ऐकल्यावर त्याची प्रतिमा अंध व्यक्तीच्या मेंदूत तयार होऊ शकेल. याच पद्धतीनं दृष्टीहीन व्यक्ती आवाजाच्या माध्यमाने बघू शकतील. दृष्टीहीन व्यक्तींवर या उपकरणाची परीक्षा करण्यात आली आणि त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत याचं निरीक्षण 'युनिव्हर्सिटी ऑफ बाथ'चे संशोधक डॉ. मायकल प्राक्स यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
'कोणतंही प्रशिक्षण दिलं नसतानाही दृष्टीहीन व्यक्तींनी या उपकरणाच्या सहाय्याने वस्तूची प्रतिमा ओळखली आणि चांगला प्रतिसाद दिला. जर अशा व्यक्तींना या उपकरणाचे योग्य प्रशिक्षण दिलं गेलं तर त्यांना आपल्या कानांनी हे जग बघता येऊ शकेल' असं शास्त्रज्ञांनी म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.