हवेवर चालणारी कार!

पेट्रोल,डिझेलच्या भाववाढीमुळे कार चालवणं महाग होऊ लगालं आहे. अशा परिस्थितीत एका ब्रिटीश वैज्ञानिकाने चमत्कार केला आहे. ब्रिटनमधील एका संशोधकाने हवेवर चालणारी कार बनवल्याचा दावा केला आहे. या कारचा सर्वाधिक वेग ४८ किमी/तास आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 19, 2013, 05:11 PM IST

www.24taas.com, लंडन
पेट्रोल,डिझेलच्या भाववाढीमुळे कार चालवणं महाग होऊ लगालं आहे. अशा परिस्थितीत एका ब्रिटीश वैज्ञानिकाने चमत्कार केला आहे. ब्रिटनमधील एका संशोधकाने हवेवर चालणारी कार बनवल्याचा दावा केला आहे. या कारचा सर्वाधिक वेग ४८ किमी/तास आहे.
पीटर डियरमॅन नामक या संशोधकाने आपल्या जुन्या कारमध्ये काही बदल करून हा चमत्कार केला आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार ही कार न थांबता ५ किलोमीटर धावू शकते. ही कार भविष्यात अत्यंत फायद्याची ठरणार आहे. कारण या कारसाठी पेट्रोल, डिझेल वापरण्याची गरज पडत नाही. यामुळे इंधनाची बचत होते.

पीटर यांनी आपल्या नव्या संशोधनाबद्दल बोलताना म्हटले, की कार हवेवर चालत असल्यामुळे या कारमुळे प्रदुषण होत नाही.या कारसाठी इंधन वापरण्याऐवजी केवळ वातावरणातील हवेचा वापर केला जातो. वातावरणातील गरम आणि थंड हवेचा वापर करूनच कार चालवता येऊ शकते. -९० अंश सेल्सअस वातावरणात हवा हलकी होते. ही हवा स्टोर करून कारसाठी वापरता येते. लवकरच अशी कार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहे.