Sourav Ganguly On Rishabh Pant suspended : दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेजर्स बंगळुरू (RCB vs DC) यांच्यात 12 मे रोजी सामना खेळवला जाणार आहे. मात्र, या सामन्यात दिल्लीचा रेग्युलर कॅप्टन ऋषभ पंत (Rishabh Pant) खेळताना दिसणार नाही. स्लो ओव्हर रेटमुळे ऋषभ पंतवर 30 लाखांची दंडात्मक कारवाई केली गेली आहे. तर आरसीबीविरुद्ध दिल्लीच्या संघाची जबाबदारी अक्षर पटेलच्या खांद्यावर असेल. मात्र, दिल्लीला नक्कीच ऋषभ पंतची कमतरता जाणवेल यात शंका नाही. मात्र, ऋषभला बीसीसीआयच्या दंडात्मक कारवाईपासून वाचवण्यासाठी सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि रिकी पॉटिंग यांची पूर्ण जोर लावला होता.
सौरव गांगुली आणि रिकी पाँटिंग सारख्या क्रिकेट दिग्गजांचा समावेश असलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या मॅनेजमेंटने ऋषभ पंतचं निलंबन मागे घेण्याचा प्रयत्न केला. सौरव गांगुलीने बीसीसीआयसमोर युक्तिवाद केला की, स्लो ओव्हर रेटला राजस्थान रॉयल्स आणि संजू सॅमसन कारणीभूत आहे. मागील सामन्यात राजस्थानच्या फलंदाजांनी एकूण 13 सिक्स मारले होते. त्यावेळी पुढचा बॉल टाण्यासाठी वेळ घ्यावा लागला. तर संजू सॅमसन बाद झाला तेव्हा रिव्ह्यू आणि इतर गोष्टींसाठी 3 मिनिटांपेक्षा अधिक वेळ गेला, असा युक्तिवाद सौरव गांगुलीने यावेळी केला.
रिकी पॉटिंगच्या मते, दिल्लीच्या गोलंदाजांनी डावाच्या शेवटी अनेक वाईड बॉल टाकले, त्यामुळे टीमला भरपाई करण्यात वेळ मिळाला नाही. त्यामुळे दिल्लीत त्यावेळी जास्त उष्णता होती, तो दिल्लीतील सर्वात उष्ण दिवस होता. त्यामुळे स्लो ओव्हर रेटची कारवाई योग्य नसल्याचं रिकी पॉटिंगने केल्याची माहिती समोर आली आहे. बीसीसीआयने मात्र कॅपिटल्सचा युक्तिवाद फेटाळला.
बीसीसीआयने निवेदनात काय म्हटलंय?
आयपीएल आचारसंहितेच्या कलम 8 नुसार, दिल्ली कॅपिटल्सने मॅच रेफरीच्या निर्णयाला आव्हान देणारे अपील दाखल केले. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी बीसीसीआयकडे करण्यात आली. मॅच रेफरीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक आहे याची पुष्टी झाली, असंही बीसीसीआयने निवेदनात म्हटलं आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ - डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, रिकी भुई, ऋषभ पंत (C), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार, अभिषेक पोरेल, जेक फ्रेझर-मॅकगर्क, प्रवीण दुबे, कुमार कुशाग्रा, रसिक दार सलाम, शाई होप, इशांत शर्मा, विकी ओस्तवाल, झ्ये रिचर्डसन, पृथ्वी शॉ, ललित यादव, यश धुळ आणि स्वस्तिक चिकारा.