www.24taas.com झी मीडिया, मुंबई
कम्प्यूटर, लॅपटॉपनंतर नामवंत कंपनी डेल आता टॅबलेट घेऊन भारतीय बाजारपेठेत उतरत आहे. venue-7 आणि venue-8 हे नवीन टॅबलेट भारतीय ग्राहकांना डोळ्यासमोर ठेऊन बनवण्यात आले आहेत. वेन्यू ७-ची किंमत १०९९९ आहे तर वेन्यू ८- साठी १७४९९ रूपये मोजावे लागतील.
ह्या टॅबलेटला इंटेल एटम झेड-२७६० पावर प्रोसेसर आहे. त्यामुळे कंपनीला चांगल्या प्रतिसादाची अपेक्षा आहे. गूगलच्या नेक्सस ७ सोबत डेलच्या टॅबलेटची लढत असणार आहे.
वेन्यू ७-
वेन्यू ७ मध्ये १२००X८००पिक्सल रिझोल्यूशलचा ७ इंचाचा डिस्प्ले आहे. १.६ गिगाहर्ट्सचा इंटल एटम झेड-२७६० ड्युअल कोअर ऑपरेटींग सिस्टीम आहे. २ जीबी रॅम आहे. हायडेफीनेशन ग्राफीक्समध्ये कमी पडत असला तरीही २ जीबी रॅममुळे हा गेमिंगसाठी चांगला टॅबलेट असेल.
इंटरनल १६ जीबी मेमरी देण्यात आलेलं आहे. मेमरी मायक्रो-एसडी कार्डच्या साथीने ३२ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. वेन्यू ७ मध्ये ४१००mAh बॅटरी आहे. कंपनीच्या म्हणण्यानूसार हा १० तासांचा हायडेफिनेशन व्हीडियो टॉकटाईम देतो. कनेक्टिव्हिटी फिचरमध्ये वायफाय, ब्लुटूथ, जीपीएस असे फिचर्स आहेत. हा एंड्रॉइड ४.२ जेलीबीनवर चालतो. ३ मेगापिक्सलचा रेअर कॅमेरा आहे. फ्रंट व्हीजीए कॅमेरा आहे
वेन्यू ८-
वेन्यू ८ मध्ये १२००X८०० पिक्सल रिझोल्युशलचा ८ इंचाचा डिस्प्ले आहे. वेन्यू ७ प्रमाणेच १.६ गिगाहर्ट्सचा इंटल एटम झेड-२७६० ड्युअल कोअर ऑपरेटींग सिस्टीम आहे.
२ जीबी रॅम आहे. हा एंड्रॉइड ४.२ जेलीबीनवर चालतो. ५ मेगापिक्सलचा रेअर कॅमेरा आहे. २ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. वेन्यू ८ मध्ये ४१००mAh बॅटरी आहे. कनेक्टीव्हिटी फिचरमध्ये वायफाय, ब्लुटूथ, जीपीएस असे फिचर्स आहेत. वेन्यू ८ हा थ्रीजी आहे. लवकरच अमेरीकन कंपनी डेल हे दोन नवीन टॅबलेट घेऊन भारतीय बाजारात लवकरच दाखल होत आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.