www.24taas.com, नवी दिल्ली
महिलांना अश्लील एमएमएस किंवा इमेल पाठविल्यास आपल्याला आता तीन वर्षाची शिक्षा होणार आहे. पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत महिलांशी गैरवर्तणूक करण्यांवर प्रतिबंध यावा यासाठी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आणि जर यात दोषी आढळल्यास जवळजवळ ७ वर्षाची शिक्षा आणि मोठ्या प्रमाणात दंड देखील ठोठावण्यात येऊ शकतो.
महिलांशी अश्लीलदृष्ट्या वागणं, किंवा त्यांना एमएमएस आणि मेल पाठविणं हा गुन्हा सिद्ध झाल्यास रूपये दोनशे ते जास्तीत जास्त ५० हजार पर्यंत किंवा जवळजवळ १ लाखापर्यंत दंड भरावा लागू शकतो. आणि त्याचसोबत तीन वर्षाची शिक्षा दे्खील भोगावी लागू शकते.
जर कोणी दुसऱ्यांदा अशी हरकत करताना सापडल्यास त्याला ७ वर्ष शिक्षा आणि १ लाख ते ५ लाखापर्यंत दंड भरावा लागू शकतो. एमएमएस आणि इमेल यांचा वापर हा देवाणघेवाणीसाठी व्हावा, त्याशिवाय अश्लील गोष्टी पाठविल्यास त्याला कायदेशीर कारावाईला सामोरं जावं लागणार आहे.