<B> <font color=red> फेसबुकवर ‘Like’ सोबतच आता असेल ‘Sympathies’चं बटण!</font></b>

दररोजच्या आयुष्यात फेसबुक आता भारतीय तरुणांमध्येच नाही तर सर्व वयोगटात फेमस आहे. फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटला आता नव्यानं जाग आलीय. ही जाग म्हणजे फेसबुक आता लाईक सारखंच Sympathiesचं बटण उपलब्ध करुन देणार आहे. यामुळं दु:खद बातमीला आपण आपली सहवेदना शेअर करु शकाल.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 10, 2013, 01:39 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दररोजच्या आयुष्यात फेसबुक आता भारतीय तरुणांमध्येच नाही तर सर्व वयोगटात फेमस आहे. फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटला आता नव्यानं जाग आलीय. ही जाग म्हणजे फेसबुक आता लाईक सारखंच Sympathiesचं बटण उपलब्ध करुन देणार आहे. यामुळं दु:खद बातमीला आपण आपली सहवेदना शेअर करु शकाल.
फेसबुकच्या यूजरमध्ये वाढ झाल्यामुळं या साईटवरील शेअरिंगच्या प्रमाणातह मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून आलंय. कारण कोणतेही असो, वाढदिवस, एखादी गुड न्यूज, नवी खरेदी, विजयोत्सव.. काहीही असले तरी फेसबुकवर शेअर केल्याविना आनंदपूर्ती झाल्याचं समाधान मिळत नाही. या पार्श्वभूमीवर ` फेसबुक ` वर एखादी दुःखद बातमी अथवा निरोप शेअर केल्यानंतरही काही यूजरकडून कळत-नकळतपणे ` लाईक` करण्यात येतं. अशा ` लाईक` मुळं ती पोस्ट शेअर करणाऱ्याच्या मनात संबंधित यूजरबाबत वाईट प्रतिमा निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे.
दुःखद घटना शेअर केल्यानंतर होणारे असे अपघात टळावेत, यासाठी आता ` फेसबुक` नं स्वतःहून पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशा शेअरिंगनंतर कोणाच्याही भावना दुखावू नयेत, या साठी ` फेसबुक` वर सहवेदना व्यक्त करण्यासाठी `Sympathies` ही सेवा नव्यानं उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
`Sympathies` चा पर्याय नव्यानं उपलब्ध करून देण्यामागं यूजरच्या भावनांची काळजी घेण्याचा आमचा उद्देश असल्याचे `फेसबुक` तर्फे स्पष्ट करण्यात आलंय. `Sympathies` चा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी `फेसबुक` चे इंजिनिअर कामाला लागले असल्याचं वृत्त ` हफिंग्टन पोस्ट` नं दिलंय.
फेसबुक यूजरनं एखादी वाईट अथवा नकारात्मक घटना आपल्या स्टेटसला टॅग केली असल्यास त्या घटनेखाली कॉमेंट बॉक्सच्या वर ऑटोमॅटिकली ` लाईक ` ऐवजी `Sympathies` चा पर्याय उपलब्ध होणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.