आता अनोळखी फेसबुक फ्रेंड्स करा `अनफॉलो`

फेसबुक... सोशल मीडिया... भारतात आता चांगलंच फोफावलंय. फेसबुकमुळं दुरावलेले मित्र मिळाले, अनेक नवीन लोकांसोबत मैत्री होते. मात्र त्याचे काही दुष्परिणामही कालांतरानं जाणवू लागलेत. त्यावरच आता फेसबुकनं नवा उपाय शोधलाय. आपल्याला नको असलेली व्यक्ती आपल्या फ्रेंड लिस्टमध्ये आहे, पण त्याच्या अपडेट्सचा आपल्याला त्रास होतो.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 5, 2013, 09:40 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
फेसबुक... सोशल मीडिया... भारतात आता चांगलंच फोफावलंय. फेसबुकमुळं दुरावलेले मित्र मिळाले, अनेक नवीन लोकांसोबत मैत्री होते. मात्र त्याचे काही दुष्परिणामही कालांतरानं जाणवू लागलेत. त्यावरच आता फेसबुकनं नवा उपाय शोधलाय. आपल्याला नको असलेली व्यक्ती आपल्या फ्रेंड लिस्टमध्ये आहे, पण त्याच्या अपडेट्सचा आपल्याला त्रास होतो.
अशा व्यक्तीला अनफ्रेंड ही करता येत नाही आणि पण त्यांच्या अपडेटस सुद्धा टाळायच्या असतात. या सर्वांसाठी फेसबुकवर अशी सुविधा आता उपलब्ध होणार आहे. एखाद्याला फ्रेंड लिस्टमध्ये ठेवूनच त्याचे अपडेट टाळता येण्याची सोय आता फेसबुकवर देणार आहे. सध्या फेसबुकवर हाईड ऑल स्टोरीज नावाचं फंक्शन आहे. पण यामुळं सर्वच अपडेट बंद होतात. आता नव्या सुविधेमुळं फेसबुकवरील मित्रांना अनफॉलो देखील करता येणार आहे.
फ्रेंड्स `अनफॉलो` करण्यासाठी काय करायचं?
आपल्या फ्रेंडलिस्टमधल्या नको असलेल्या मित्राच्या प्रोफाईलवर जायचं… मग तिथं मॅसेजच्या बाजूला आणखी एक बटण दिसेल. त्यात तुम्ही त्या व्यक्तीचे मित्र आहात की नाही हे तर असेलच सोबत यी व्यक्तीला आपण फॉलो करतोय की नाही, हे सुद्धा असेल. त्यामुळं फॉलो डिसॅबल करुन तुम्ही त्या व्यक्तीच्या पोस्ट अपडेट्स टाळू शकता.
ट्विटरची ही फॉलोची संकल्पना काही महिन्यांपूर्वीच फेसबुकनं उचललीय. एकमेकांच्या अपडेटशी ट्यून अप राहता यावं यासाठी फॉलो फिचर फेसबुकमध्ये देण्यात आलं. एखाद्याशी फ्रेंड न होतासुद्धा त्याला फॉलो करणं यामुळं सहज शक्य झालं होतं. आता याच्या उलट प्रक्रिया म्हणजे एखाद्याला फ्रेंडलिस्ट ठेवून त्याचे अपडेट न्यूज फीडमध्ये येऊ नयेत अशी सुविधा नव्या फीचरमुळं सहज शक्य होणार आहे. एखाद्याशी फ्रेंड राहता येणं पण त्याचे अपडेट टाळणे हे दोन्ही हेतू यातून सहज शक्य होणार आहे.
फेसबुकवर ही सुविधा उपलब्ध होण्यासाठी काही महिने वाट पहावी लागणार आहे, तोपर्यंत तरी तुमच्या नको असलेल्या मित्रांच्या अपडेटपासून काही सुटका नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.