भारतात फेसबुकपेक्षा `फेक`बुकच जास्त!

फेसबुकवर अकाऊंट नसणारे तरुण मिळणं आता अशक्य झालंय. भारतीय तरुणांमध्ये फेसबुकचं वेड वाढलं आहे. मात्र फेसबुकवरील १४.३ कोटी अकाउंट खोटी असल्याची माहिती समोर आली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 4, 2013, 04:34 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
फेसबुकवर अकाऊंट नसणारे तरुण मिळणं आता अशक्य झालंय. भारतीय तरुणांमध्ये फेसबुकचं वेड वाढलं आहे. मात्र फेसबुकवरील १४.३ कोटी अकाउंट खोटी असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्य म्हणजे नकली अकाउंट्स ही भारतातच तयार केली जात असल्याची माहिती मिळाली आहे.
फेसबुकवर जगभरात ११९ कोटी अकाऊंट्स आहे. युएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन (एसईसी)चं म्हणणं आहे की ७.९ % अकाऊंट्स डुप्लिकेट आहेत आणि २.१ टक्क्यांहून जास्त युझर्स मिसक्लासिफाईड आणि १.२ टक्क्यांहून जास्त युझर्स अनडिझायरेबल आहेत.
फेक अकाऊंट्स असलेल्या युझर्सचं सर्वांधिक प्रमाण भारत आणि तुर्की या देशांमध्ये आहेत. डुप्लिकेट अकाऊंट्स म्हणजे जो युझर त्याचं किंवा तिचं अतिरिक्त अकाऊंट ओपन करतो. तर फेक अकाऊंट्स मिसक्लासिफाईड आणि अनडिझायरेबल युझर्स अशा दोन गटात विभागण्यात आले आहेत. यामधील एकूण ११९ कोटी फेसबुक अकाऊंट्सपैकी सुमारे १०% फेक अकाऊंट्स भारत आणि तुर्कीमध्ये आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.