www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आज जगात प्रत्येक देशात लहानंपासून मोठ्यांपर्यंत कोणीही गूगल सर्च केल्याशिवाय राहात नाही. मात्र आपण हे ऐकून हैराण व्हाल की गूगलने गुप्तपणे आकडेवारीची चोरी केल्यामुळे गूगलला ७० लाख डॉलरचा (१० कोटी रु. पेक्षा हा जास्त) दंड लावण्यात आला आहे. हे गोष्ट कल्पनाशक्तीच्या पलीकडे आहे. ब्रिटिनमधल्या एका म्युझियममध्ये ठेवण्यात आलेल्या ४००० वर्ष जुने शिल्प हे स्वत:च आपोआप फिरते. हे ऐकायंला खोट वाटत असलं तरी हे खरोखर झाले आहे. या म्युझियममध्ये अशाच काही मनोरंजक वस्तू ठेवण्यात आल्या आहे.
नकाशा बनवणाऱ्या खाजगी सेवाचे वाय-फाय हॉटस्पॉट यांची आकडेवारी गुप्तपणे चोरी केल्यामुळे गूगलला अमेरिकेमध्ये ७० लाख डॉलरचा दंड लावण्यात आला आहे. त्यामुळे गूगल कंपनी हा दंड भरण्यास देखील तयार झाली आहे. कायदेशीरपणे गूगलने १२ मार्चला घोषणा केली होती की, २००८ आणि २०१० मध्ये अमेरिकेतील रस्ते, व्ह्यू, वाहने यांच्याद्वारे संग्रहीत करण्यात आलेले ई-मेल, पासवर्ड, वेब इतिहास आणि बाकी आकडे नष्ट करणार आहे.
ब्रिटिनच्या मँचेस्टर वस्तू संग्रहालयात ४००० वर्ष जुनी इजिप्तच्या एका शिल्पाने येथील लोकांना आश्चर्यात टाकले आहे. हे शिल्प स्वत: भोवती १८० डिग्री फिरायला लागले. त्यामुळे ते प्रसिद्धीस आले. इ.स.पू. १८०० ची १० इंच लांब मूर्ती एका ममीच्या कब्रेशी मिळत होती आणि हे शिल्प मँचेस्टर संग्रहालयात ८० वर्षांपर्यंत होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.