www.24taas.com, लंडन
भारतीय वंशाच्या एका व्यक्तीनं सायकल चालकांसाठी एक असं हेल्मेट बनवलंय, ज्याद्वारे आपत्कालीन घटनांची सूचना मिळू शकेल. ही व्यक्ती व्यवसायानं ‘शेफ’ आहे.
हे हेल्मेट सायकलस्वारच्या फोनशी जोडलेलं असेल. यामध्ये ब्लूटूथही कार्यरत असेल. यामध्ये एक सेन्सरही असेल ज्यामुळे दुर्घटनेची चाहूल लागताच हा सेन्सर सायकल स्वाराला सूचना करील.
ओकलोहामा शहरातील सॉफ्टवेअर कंपनी ‘आयसीईडॉट’द्वारे बनवण्यात आलंय. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस जेनथोफर यांनी याबद्दल माहिती दिलीय. या हेल्मेटची खरी कल्पना आहे ती बिजू थॉमस नावाच्या व्यक्तीची. बिजू हा सायकलस्वारांसाठी जेवण बनवण्याचं काम करतो.
बिजू थॉमस एकटाच एका सायकल यात्रेसाठी निघाला होता. यावेळी त्याला एका अपघातला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर, हा अपघात खूप भयंकर असता तर ही दुर्घटना कशी आणि कुठे झाली याबद्दल कुणालाच कळू शकलं नसतं असं त्याच्या लक्षात आलं. आणि त्यामुळेच या संकटमोचक हेल्मेटची संकप्लना त्याला सुचली.