मनपाच्या मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना हिंदीमध्ये प्रगतीपुस्तकं!

मुंबई महापालिकेच्या एका शाळेत मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना चक्क हिंदी रिपोर्ट कार्ड दिली गेली आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 2, 2013, 05:34 PM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबई महापालिकेच्या एका शाळेत मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना चक्क हिंदी रिपोर्ट कार्ड दिली गेली आहेत. पालिकेच्या शाळांचा निकाल 30 एप्रिलला जाहीर झालाय. कुर्ल्यातील साकीनाक्याच्या काजूपाडा मराठी शाळा क्र. 2 मध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय.
शाळेतल्या जवळपास 40 विद्यार्थ्यांना चक्क हिंदी प्रगती पुस्तक दिलं गेलंय. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची प्रगतीपुस्तकं हिंदीत कशी, असा प्रश्न पालकांना पडलाय. शिक्षण विभागाच्या या गलथान कारभारावर टीका होतेय. शिक्षण विभागाचं बजेट तब्बल 2600 कोटी रुपये असताना हा निष्काळजीपणा केला जातोय, हे विशेष...

याबाबत शिक्षण विभागाकडे विचारणा केली असता ही चूक शाळांच्या माथी मारण्यात आलीये. मराठी प्रगतीपुस्तकं कमी होती, तर ती शाळांनी मागून घ्यायला हवी होती, असं शिक्षण समितीचे अध्यक्ष रविंद्र भिसे यांनी म्हटलंय.