HTC डिझायर सीरीजचे दोन स्मार्टफोन

एचटीसी डिझायर 210 डुअल सिम फोन एंड्राईड 402 जेलीबीनवर आधारीत फोन आहे. या फोनची स्क्रीन 4 इंच आहे आणि रिझॉल्यूशन 480 800 पिक्सेल आहे.

Updated: Apr 23, 2014, 11:19 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तैवानची कंपनी एचटीसीने भारतात दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. यात एचटीसी डिझायर डुअल सिम 210 आणि डिजायर 816. याशिवाय कंपनीने स्मार्टफोन एचटीसी वन (M8) ला भारतात प्रदर्शनात मांडण्याची घोषणाही यावेळी एचटीसीने केली.
एचटीसी डिझायर 210 डुअल सिम फोन एंड्राईड 402 जेलीबीनवर आधारीत फोन आहे. या फोनची स्क्रीन 4 इंच आहे आणि रिझॉल्यूशन 480 800 पिक्सेल आहे. या ड्युयल सिम फोनमध्ये दोन जीएसएम सिमसाठी जागा देण्यात आली आहे.
या फोनची किंमत 8 हजार 700 रूपये आहे. हा फोन 10 हजारात उपलब्ध असलेल्या स्वस्त स्मार्टफोन पैकी एक आहे. या फोनला 5 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेरा 0.5 मेगापिक्सेल आहे. या फोनमध्ये 4 जीबी इंटरनल स्टोरेजची सोय आहे. ही क्षमता 32 जीबी पर्यंत करता येऊ शकते. या फोनची बॅटरी 1300 एमएएचची आहे.
एचटीसी डिझायर 816
एचटीसी डिझायर 816 ची किंमत 23 हजार 990 रूपये आहे. हा 1 जीएचझेड ड्युयल कोर मीडिया टेक प्रॉसेसर आहे. या फोनची रॅम 1.5 जीबी आहे. या फोनची स्क्रीन 5.5 इंचची आहे.
हा स्मार्टफोन 1.6 जीएचझेड क्वाड कोर स्नॅपड्रॅगेन 400 प्रॉसेसरने चालतो. या फोनमध्ये 8 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. याशिवाय 128 जीबीपर्यंत मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट आहे. एचटीसी डिजायर 816 मध्ये 13 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. या फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सेलचा आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.