मोबाइल पाण्यात भिजला तर

तुम्हांला हे माहित आहे का आपण जरा खबरदारी घेतली तर पाण्यात भिजल्यानंतरही तुमच्या मोबाइल पहिले सारखा काम करू शकतो.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 28, 2016, 08:40 PM IST
मोबाइल पाण्यात भिजला तर title=

www.24taas.com, मुंबई मोबाइल आज सामन्यांची गरज बनली आहे. आपण नेहमी ऐकतो की पाण्यात भिजल्यामुळे माझा मोबाइल खराब झाला.

अशावेळी आपण मोबाइल दुकानदाराकडे देतो किंवा कडक उन्हात ठेवतो. पण तुम्हांला हे माहित आहे का आपण जरा खबरदारी घेतली तर पाण्यात भिजल्यानंतरही तुमच्या मोबाइल पहिले सारखा काम करू शकतो.

तर तुम्ही पुढील पाऊले उचलली तर तुमच्या मोबाइल वाचू शकतो....

• पाण्यात पडलेल्या मोबाइल फोनची बॅटरी सुरूवातीला काढू ठेवा. कारण पाण्यामुळे बॅटरी असलेली पावर फोनला नुकसान पोहचवू शकते.

• कधीही पाण्याने भिजलेल्या फोनला ऑन करण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे फोनमध्ये शॉर्ट सर्किट निर्माण होऊ शकते.

• पाण्याने भिजलेल्या फोनला स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घ्या. यासाठी तुम्ही टिश्यू पेपरचाही वापर करू शकतात.

• फोन पूर्णपणे पाण्याने भिजला असेल तर एक घरगुती उपायही तुम्ही करू शकतात. यात तुम्ही फोन ऑन न करता एका मोठ्या वाटीत म्हणजे फोन पेक्षा मोठ्या वाटीत तांदुळ घेऊन त्यात २४ तासांसाठी फोन ठेऊन द्या. तांदुळ फोनमधील पाणी शोषून घेतो आणि २४ तासानंतर तुम्ही पुन्हा फोन वापरू शकतात.