सावधान! डेबिट-क्रेडिट कार्डवर डल्ला मारणारा `डेक्स्टर ब्लॅक` भारतात!

डेबिट-क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या आणि त्याद्वारे खरेदी करणाऱ्या ग्राहकांनो जरा हे वाचा... सध्या कार्डवरील गुप्त माहिती चोरणारा व्हायरस भारतात दाखल झालाय. ऑनलाईन व्यवहारांच्या सुरक्षेसाठी रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या नव्या धोरणाला हॅक करणारा व्हायरस आता तयार झालाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 20, 2014, 09:42 AM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
डेबिट-क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या आणि त्याद्वारे खरेदी करणाऱ्या ग्राहकांनो जरा हे वाचा... सध्या कार्डवरील गुप्त माहिती चोरणारा व्हायरस भारतात दाखल झालाय. ऑनलाईन व्यवहारांच्या सुरक्षेसाठी रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या नव्या धोरणाला हॅक करणारा व्हायरस आता तयार झालाय.
आपण कोणतीही खरेदी करत असतांना आता पिन नंबर टाईप करण्याची सक्ती रिझर्व्ह बँकेनं केलीय. मात्र आता कार्ड स्वाइप केल्यानंतर खरेदीदाराची सर्व गुप्त माहिती हॅक करणारा हा व्हायरस आहे.
व्यक्तीच्या माहितीच्या आधारं बनावट कार्ड तयार करून त्याद्वारे तुमच्या खात्यातील पैशांची चोरी होऊ शकते... तेव्हा सावधान राहा...
अमेरिका, जर्मनी, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियात सर्वाधिक धुमाकूळ घालणारा हा `डेक्स्टर ब्लॅक` नावाचा व्हायरस भारतातही शिरला असल्याचा धोक्याचा इशारा सीईआरटी या सायबर सुरक्षेसाठी काम करणाऱ्या संस्थेनंही दिलाय.
कशी कळते हॅकर्सना माहिती?
क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डच्या मॅग्नेटिक स्ट्रिपमध्ये ट्रॅक १, ट्रॅक २ असे तीनपर्यंत व्हर्च्युअल ट्रॅक असतात. त्यात कार्डधारकाचं नाव, खातं क्रमांक, कार्डची एक्स्पायरी डेट, सीव्हीव्ही कोड आणि इतर माहिती साठवून ठेवलेली असते. मॉल किंवा दुकानातील कार्ड रीडर मशिनमध्ये कार्ड स्वाइप केल्यावर ही माहिती त्या मशिनद्वारं बँकेच्या सर्व्हरपर्यंत पाठवून पडताळून पाहिली जाते. ही माहिती चोरीला गेल्यास किंवा हॅक झाल्यास अशाच प्रकारचं बनावट कार्ड तयार करता येतं.
कसे वाचाल या व्हायरसपासून?
ज्याप्रमाणं ऑनलाईन टान्झॅक्शन करतांना पासवर्डच्या व्यतिरिक्त वन टाईम पासवर्ड (ओटीपी नंबर), ३ डी सिक्युअर पिन, व्हेरिफाइड बाय व्हिसा अशी सुरक्षेची तरतूद केली जाते. त्याचप्रमाणं क्रेडिट-डेबिट कार्ड दिलेल्या कंपनीच्या वेबसाईटवरून किंवा बँकेच्या वेबसाईटवरून हे कोड तुमच्या कार्डसाठी मिळवता येतात.
याशिवाय शंका आल्यास तुम्ही पिन (पासवर्ड) बदलू शकता किंवा बँकेकडून कार्ड बदलून घ्या

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.