तो १७ व्या वर्षी झाला करोडपती

ज्या वयात शिक्षण घ्यायचे त्या वयात एक १७ वर्षांचा तरूण एक, दोन, तीन नाही तर तब्बल ३२५ कोटींचा मालक झाला आहे. त्यांने १५ व्या वर्षी `समली` अॅप्लिकेशन बनविले. या अॅप्लिकेशनला चांगलाच भाव आलाय. त्याची किंमत ३२५ कोटी रूपयांच्या घरात आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 26, 2013, 04:29 PM IST

www.24taas.com,लंडन
ज्या वयात शिक्षण घ्यायचे त्या वयात एक १७ वर्षांचा तरूण एक, दोन, तीन नाही तर तब्बल ३२५ कोटींचा मालक झाला आहे. त्यांने १५ व्या वर्षी `समली` अॅप्लिकेशन बनविले. या अॅप्लिकेशनला चांगलाच भाव आलाय. त्याची किंमत ३२५ कोटी रूपयांच्या घरात आहे.
१७ वर्षांचा निक डी अलोइसियो याने याहूसाठी एक अॅप्लिकेशन विकले. या अॅप्लिकेशनला करोडो रूपयांची बोली लागली. `समली` नावाचे हे अॅप्लिकेशन त्यांने वयाच्यी १५ व्या वर्षी बनविले. हे अॅप्लिकेशन स्वत:चे काम स्वत:च करते. न्यूज रिडर अॅप्लिकेशन याहू कंपनीने खरेदी केले आहे.त्याच्या अॅपद्वारे अनेक प्रतिष्ठित वृत्त समुहांच्या महत्त्वाच्या आणि लोकप्रिय बातम्या, लेख, व्हिडिओ आदी झटपट पाहता येणार आहे.

`समली` अॅप्लिकेशनची अधिकृत किमत किती आहे याची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, लंडन येथील लंडन इव्हिनिंग स्टॅंडर्डच्या दाव्यानुसार याहू हे अॅप्लिकेशन ३-६ कोटी डॉलर (म्हणजेच १६३ ते ३२५ कोटी) ला खरेदी करेल. त्यामुळे १७ व्या वर्षी अलोइसियो हा करोडपती झालाय.