www.24taas.com, नवी दिल्ली
मारूती सुझुकी ऑल्टोचे ८०० सीसीचे नवीन मॉडेल लवकरच बाजारात दाखल होणार आहे. या गाडीचे बुकींग सुरू झाले आहे. केवळ ५,०००रूपयांमध्ये बुकींग करता येणार आहे.
ऑल्टो-८०० ही नवीन कारमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याआधीच्या मॉडेलपेक्षा एक उत्तर कार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या कारची किमत २ ते २.५ लाख किंतम हे. ही कार पेट्रोल आणि गॅस अशा दोन प्रकारात असणार आहे. कारची अंतर्गत रचना अधिक आकर्षक करण्यात आली आहे. डॅशबोर्ड सुसज्ज आहे.
गाडीमध्ये बसण्यास जास्त पेस देण्यात आली आहे. ही कार दसरा आणि दिवाळीच्या दरम्यान बाजारात दाखल होईल, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. नव्या कारचा ऑल्टोपेक्षा जास्त खप होईल, अशी कंपनीची अपेक्षा आहे.
नवीन ऑल्टो ८०० बुक करण्यासाठी http://www.marutisuzukialto800.com/ या संकेतस्थळाला भेट द्या. बुकींगसाठी ५००० रूपये असणार आहे.
नवी कार सहा मॉडेलमध्ये उपलब्ध असणार आहे. यात तीन सीएनजी तर तीन पेट्रोलवर असणार आहेत. पेट्रोलवरील कारचे मायलेज प्रति लिटर २३ किलोमीटर असणार आहे. तर सीएनजीवर चालणारी कार ३१ किमी मायलेज देईल.
अंतरर्गत रचना फॅनशेबल आणि ट्रेंडी आणि स्टायलिश असणार आहे. ही कार सहा रंगामध्ये उपलब्ध असणार आहे. पेट्रोलवरील कारची किंमत २.५ ते ३ लाख दरम्यान आहे. तर सीएनजीवरील कारची किंमत ३ ते ३.५ लाखाच्या घरात असणार आहे.