www.24taas.com, मुंबई
पावसाचा लहरीपणा हवामान खात्यालाही व्यवस्थित समजून घेणं जड जातं. अनेकवेळा त्यांचे अंदाज खोटे ठरवण्याचं काम पाऊस करत असतो. त्यामुळे पावसाला निश्चित स्वरुपात समजून घेण्याचा प्रयत्न अजूनही चालूच आहे.
आता पावसाचा लहरीपणा समजून घेता यावा, यासाठी शास्त्रज्ञ अरबी समुद्राच्या तळाशी खोल खड्डा खोदणार आहेत. यातून समुद्रतळाचे नमुने तपासून हजारो वर्षांपूर्वीचे जलवायूच्या परिवर्तनासंबंधित माहिती मिळवणार आहेत. यातून हवामानाबद्दल अधिक ठोस माहिती मिलेल, असा संशोदखांचा दावा आहे. यासाठी शास्त्रज्ञांनी मुंबई किनाऱ्यापासून 400 समुद्र मैलांवरील लक्ष्मी बेसीन येथील समुद्र तळाचे नमुने घेण्याची योजना तयार केली आहे.
भू-विज्ञान मंत्रालयाचे सचिव शैलेश नायक म्हणाले, की समुद्री तळाच्या विविध नमुन्यांची माहिती मिळवण्यासाठी आणि एक-दोन विज्ञान संस्थांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे नमुने एकत्र करण्याचं काम 3 महिने चालेल. या कार्यक्रमाचा उद्देश हजारो वर्षांपूर्वीच्या मान्सूनच्या इतिहासाची माहिती करून घेणं आणि ते वातावरण पुन्हा निर्माण करणं हा असेल. यामध्ये हिमालयाच्या उत्पत्तीचाही अभ्यास करण्यात येणार आहे.