तुम्हीही म्हणाल... हा मोबाईल आहे की बॉल?

महागडा स्मार्टफोन खाली पडल्यानंतर तुटेल-फुटेल अशी भीती तुमच्याही मनात असेल तर यावर तुम्हाला लवकरच एक उपाय मिळणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 24, 2013, 05:05 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मेलबर्न
महागडा स्मार्टफोन खाली पडल्यानंतर तुटेल-फुटेल अशी भीती तुमच्याही मनात असेल तर यावर तुम्हाला लवकरच एक उपाय मिळणार आहे. वैज्ञानिकांनी स्मार्टफोनसाठी एक असं मेटेरियल तयार केलंय जे रबराप्रमाणेच वाकडं-तिकडंही करता येईल... आणि खाली पडल्यानंतर हा मोबाईल तुटणार नाही तर रबराच्या बॉलप्रमाणे वरती उडी मारील.
या मटेरियलचं निर्माण केलंय मेलबर्न इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यूनिव्हर्सिटीनं (आरएमआयटी)... आणि या नवनिर्माणाचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे याविषयी संशोधन करणाऱ्या टीममधला एक भाग भारतवंशी वैज्ञानिकांचा आहे.
‘आरएमआयटी’च्या फंक्शनल मटेरिअल अॅन्ड मायक्रो सिस्टम रिसर्च ग्रुपच्या वैज्ञानिकांनी ऑक्साईड मटेरियलला दबाव सहन करण्यासाठी आणि इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी कायम राखण्यायोग्य बनवलंय. यामुळेच एका उपकरणात लवचिकता आणण्यात ते यशस्वी झालेत. यापूर्वी ऑक्साईड मटेरिअल खूप उच्च तपमाणामुळे लवचिक इलेक्ट्रॉनिक उपकरण बनवणं कठिण झालं होतं.

या संशोधनाचे मुख्य लेखक फिलिप गुटरुफ यांच्या म्हणण्यानुसार, या प्रक्रियेमुळे अनेक लवचिक उपकरणं बनवण्याता येऊ शकतील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.