तुम्ही `विंडोज एक्स पी` वापरताय?... सावधान!

तुमच्या कम्प्युटर `विंडोज एक्स पी` या ऑपरेटींग सिस्टमवर काम करत असेल तर सावधान... ८ एप्रिलनंतर या सिस्टमला मायक्रोसॉफ्टचा सपोर्ट बंद होणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 10, 2014, 07:09 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तुमच्या कम्प्युटर `विंडोज एक्स पी` या ऑपरेटींग सिस्टमवर काम करत असेल तर सावधान... ८ एप्रिलनंतर या सिस्टमला मायक्रोसॉफ्टचा सपोर्ट बंद होणार आहे. म्हणजेच, कंपनीकडून या ऑपरेटींग सिस्टमला कोणत्याही प्रकारची मदत मिळणार नाही. म्हणजेच, समजा तुमच्या विंडोज एक्स पीमध्ये व्हायरस घुसला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत मिळणार नाही. याशिवाय कंपनी कोणत्याही प्रकारच्या हॅकींगला मॉनिटरही करणार नाही.
मायक्रोसॉफ्ट इंडियाचे एमडी केतन बाजवा यांच्या म्हणण्यानुसार, आता केवळ ३० दिवस उरलेत.... यानंतर आम्ही या ऑपरेटींग सिस्टमला सपोर्ट बंद करणार आहोत. कोणतीही टेक्नोलॉजी पाच वर्षांपेक्षा जास्त काळ टीकत नाही अशावेळी मायक्रोसॉफ्टनं एक्सपीला गेल्या १२ वर्षांपासून सपोर्ट केलं. पण, ८ एप्रिलनंतर यासाठी कोणतीही अपडेट किंवा सॉफ्टवेअर उपलब्ध होऊ शकणार नाही.
सध्या, मोठमोठ्या कंपन्यांमध्ये ४० लाखांहून अधिक कम्प्युटर विंडोज एक्स पीवर काम करत आहेत. यातील अनेक उपभोक्ते विंडोज ७ किंवा ८ मध्ये जाताना दिसत आहेत. बँका आणि सरकारी कंपन्यांमध्येही विंडोज एक्सपीवर काम सुरु आहे परंतु, या उपभोक्त्यांना येत्या काळात अनेक अडचणींना तोंड द्यावं लागण्याची शक्यता आहे.
मायक्रोसॉफ्टकडे सध्या तीन प्रकारचे ऑपरेटींग सिस्टम आहेत त्यामुळे तिघांनाही सपोर्ट करणं कंपनीसाठी कठिण होत चाललंय. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.