www.24taas.com, नवी दिल्ली
`आकाश टॅबलेट` च्या वाटपात उशिर केल्यामुळे नरेंद्र मोदींनी कडाडून टीका केली होती. त्यानंतर मानव संसाधन विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना दोन आकाश टॅबलेट पाठवले आणि मोदींना असा सल्ला दिला की शिक्षणाला राजकारणापासून दूरच ठेवा.
टॅबलेट सोबत २६ सप्टेंबर रोजी सिब्बल यांनी मोदींना एका पाठवलेल्या पत्रात असे म्हटले होते की, तुमच्या वक्तव्याने मी निराश झालो आहे. शिक्षण हे एक असे क्षेत्र आहे की जे राजकारणापासून वेगळे आहे. आपल्याला देशाचे भवितव्य सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि त्यासाठी राष्ट्राच्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी एकत्र आले पाहिजे.
सिब्बल यांनी सांगितलं, “मी मुख्यमंत्र्यांना टॅबलेट पाठवली आहेत. ते स्वतःच्याच दुनियेत मग्न असतात, मी त्यांना प्रत्यक्षात दाखवून दिले की आकाश तुमच्या हातात आहे.”
मोदींनी आपल्या भाषणात म्हटले होते की, गाजावाजा केलेला आकाश टॅबलेट अजून धरतीवर आलेला नाही. कधी काळी लोकांच्या हातात येणार, असं सांगण्यात आलेला आकाश अजून जनतेपर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे राज्यात काँग्रेसने फुकट लॅपटोप वाटपाची खोटी अश्वासनं देऊ नयेत.