www.24taas.com, नवी दिल्ली
बलात्काराच्या वाढत्या घटनांवर प्रतिबंध घालण्यासाठी इंटरनेटवरील पॉर्न साइट्सवर बंदी घालण्यासाठी सरकारकडून गंभीर पावलं उचलली जात आहेत. सायबर क्राइम शाखेकडून सरकारने यासंदर्भात अहवाल मागवला आहे. ६०% इंटरनेट युजर्स पॉर्न साइट्स पाहात असतात, हे या अहवालात स्पष्ट झालं आहे.
भारतामध्ये इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या दिवसें दिवस वाढत आहे. इंटरनेटवर कुठल्याही प्रकारचं सेंसॉर नाही. इंटरनेट वापरणाऱ्यांमध्ये लहान मुलांचं प्रमाणही मोठं आहे. त्यात एकुण अश्लील वेबसाइट्स पाहाणाऱ्यांची संख्या ६० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे सुमारे ५४६ पॉर्न साइट्सवर भारतात प्रतिबंध घालण्याची तयारी सुरू केली गेली आहे. या वेबसाइट्सवर बंदी घालण्यासाठी याहू, गुगल यांसारख्या सर्च इंजिन्सचीही मदत घेण्यात येत आहे.
दिल्लीत पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या मनोजने आपण बलात्कार पाहाण्यापूर्वी पॉर्न वेबसाइट पाहात असल्याची कबुली दिली आहे. या वेबसाइट पाहून उत्तेजित होऊन बहुतेकवेळा बलात्कार केले जात असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे अशा वेबसाइट्स बंद करण्याची मागणी होत आहे.