www.24taas.com,झी मीडिया,नवी दिल्ली
वाढत्या स्मार्टफोनच्या स्पर्धेत आता मोटोरोलाचा ‘मोटो एक्स’ही मार्केटमध्ये आपले स्थान पक्कं करण्यासाठी सज्ज झालाय. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मोटोरोलाचा पहिला वहिला स्मार्टफोन `मोटो एक्स` १ ऑगस्टला लाँच होतोय. कंपनीने ३ जुलैला या फोनची जाहिरात देण्यात आली होती.
'मोटो एक्स’ पूर्णपणे अमेरिकेत तयार करण्यात आलाय. डिझाईनपासून ते टेक्निकपर्यंत सर्व काही अमेरिकेत बनवण्यात आलंय. खरंतर काही दिवसांपूर्वी या नव्या मोबाईलचे फोटो एका मिटींग दरम्यान उघड झाले होते. मोटोरोलाचा नवा फोन गुगलच्या देखरेखीखाली बनवण्यात आलाय. २०१२ मध्ये गुगलने मोटोरोला या मोबाईल कंपनीला खरेदी केले होते.
मोटोरोलाच्या मोटो एक्समध्ये १.७ गीगाहर्टझ ड्युअल कोर प्रोसेसरचा वापर केलेला आहे. यात २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटरनल मेमरी उपलब्ध आहे. यात ४.२.२ जेली बीन अँड्राईड सिस्टीमचा वापर केलाय. यात १० मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे तर फ्रंट कॅमेरा २ मेगापिक्सेलचा आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.