सेट टॉप बॉक्सला मिळणार मुदत वाढ?

सेट टॉप बॉक्स लावा, अन्यथा ३१ मार्चनंतर आपल्याला टिव्ही पाहता येणार नाही. काळा पडदा दिसेल, अशी आपल्याला टिव्हीवर सध्या एजाहितात पाहायला मिळत आहे. मात्र, सेट टॉप बॉक्सला मुदत वाढ मिळण्याची शक्यता आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 18, 2013, 08:09 AM IST

www.24taas.com, मुंबई
सेट टॉप बॉक्स लावा, अन्यथा ३१ मार्चनंतर आपल्याला टिव्ही पाहता येणार नाही. काळा पडदा दिसेल, अशी आपल्याला टिव्हीवर सध्या एजाहितात पाहायला मिळत आहे. मात्र, सेट टॉप बॉक्सला मुदत वाढ मिळण्याची शक्यता आहे.
देशभरात एकूण ३८ शहरांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील केबल डिजिटायजेशनसाठीची डेडलाइन ३१ मार्च आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात धुलिवंदन (बुधवार), गुड फ्रायडे (शुक्रवार) या सुट्या आहेत. या सुट्ट्यांमुळे केबल डिजिटायजेशन करणाऱ्या कंपन्यांचे काम थंडावण्याची शक्ययता आहे. त्यामुळे या आठवड्यात आलेल्या सुट्यांमुळे डिजिटायजेशनसाठी आणखी आठवडाभर मुदतवाढ मिळू शकेल, अशी चर्चा आहे.

डिजिटायजेशनच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील नऊ शहरांचा समावेश आहे; त्यामध्ये पुणे, नागपूर, ठाणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, औरंगाबाद आणि सोलापूर यांचा समावेश आहे.
डायरेक्ट टू होम सेवा पुरवठादार, तसेच मल्टिसिस्टिम ऑपरेटर्सनीदेखील सेट टॉप बॉक्स साठीची पुरेपूर तरतूद केली आहे; मात्र शेवटच्या टप्प्यात डेडलाइन जवळ येताना अधिकाधिक यंत्रणा उपलब्ध करून देण्यावर कंपन्यांचा भर आहे. त्यामुळे सुट्यांचा कालावधी उलटून गेल्यावर आठवडाभराची मुदत अधिक मिळते का, यासाठी कंपन्या प्रयत्नशील आहेत.
तर अहमदाबाद, अमृतसर आणि लुधियाना यांसारख्या शहरांमध्ये डिजिटायजेशनची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित शहरांमध्ये ६० टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आलेय.