www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
नोकियाचे फोन आता मायक्रोसॉफ्ट मोबाईल नावानं ओळखले जातील. मायक्रोसॉफ्टनं नोकियाच्या मोबाईल फोन डिव्हिजनला विकत घेतलंय. मात्र ही डील या महिन्यात पूर्ण होणार आहे त्यापूर्वीच त्यातली ही बातमी लीक झालीय.
मायक्रोसॉफ्ट-नोकिया डीलच्या लीक झालेल्या लेटरनुसार डील याच महिन्याच्या अखेरीस पूर्ण होणार आहे. ज्यानंतर नोकिया फोनचं डिव्हिजन हे मायक्रोसॉफ्ट मोबाईल्स ओवाईच्या नावं होईल. नोकिया-मायक्रोसॉफ्टचा हा कराराच्या या लेटरबाबतीत विंडोज फोनवर नजर ठेवणारी वेबसाइट डब्लूएमपॉवर डॉट कॉमच्या एका रिपोर्टमध्ये सांगितलंय.
या कराराचा असा अर्थ होत नाही की नोकिया पूर्णपणे संपेल. कारण मायक्रोसॉफ्ट फक्त नोकिया फोनचं डिव्हिजन विकत घेत आहे. ज्यात फिचर फोन तयार करणारी टीमही सहभागी असेल.
मायक्रोसॉफ्टच्या करारानंतर शिल्लक राहिलेल्या कंपनीचं नाव नोकियाच असेल. विशेष म्हणजे मायक्रोसॉफ्टनं ७.२ अब्ज डॉलरच्या या करारात आगामी १० वर्षांसाठी नोकिया ब्रँडचं हे नाव वापरण्याचं लायसन्स सुद्धा विकत घेतलंय. करारानुसार २०१५पर्यंत मायक्रोसॉफ्ट नोकिया नावाचा वापर करत काही स्मार्टफोन बनवेल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.