www.zee24taas.com, झी मीडीया, मुंबई
नुकतचं फेसबुकने दहा वर्ष पूर्ण केलयं. या दहा वर्षात फेसबुकने बऱ्याच नवनवीन गोष्टी दिल्या आहेत. सध्या वीबर, लाईन, वुई चॅट यासारखे अॅप मोफत फोन कॉलसाठी लोकप्रिय आहेत आणि त्यालाच टक्कर देण्यासाठी की काय, फेसबुकने सोशल मॅसेजिंग अॅप्लिकेशनमध्ये मोफत फोन कॉलची सुविधा सुरु केलीयं.
फेसबुक मॅसेंजरमधून आपल्याला चॅट, फोटो आणि व्हिडोओ अशा बऱ्याच गोष्टी शेअर करता आल्यामुळे फेसबुक जगात लोकप्रिय ठरलयं. म्हणूनचं मोफत फोन कॉलची सुविधेला चांगलाच प्रतिसाद मिळले अशी, आशा व्यक्त केली जात आहे.
फेसबुकची ही मोफत फोन कॉलची सुविधा फक्त अँड्रॉईड फोनवर वापरता येत असल्यामुळे दोघांकडेही अँड्रॉईड फोन असणे आवश्यक आहे.
फेसबुकमधून मोफत कॉल करण्यासाठी मॅसेंजरच्या चॅट पर्यायमधून फ्रेंड इन्फोमध्ये जावे, तेथे मोफत कॉल पर्याय निवडावा आणि मग सुरु होईल मोफत कॉलिंग.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.