पाहा सोशल मीडियाचा बाप्पा! गणेश चतुर्थीच्या संदेशांचा वर्षाव

राज्यात आज वाजत-गाजत बाप्पाचं स्वागत होतंय. सर्व व्यक्ती नाचत-गात या विघ्नहर्त्यांचं स्वागत करतायेत. 

Updated: Sep 17, 2015, 05:48 PM IST
पाहा सोशल मीडियाचा बाप्पा! गणेश चतुर्थीच्या संदेशांचा वर्षाव  title=

मुंबई: राज्यात आज वाजत-गाजत बाप्पाचं स्वागत होतंय. सर्व व्यक्ती नाचत-गात या विघ्नहर्त्यांचं स्वागत करतायेत. 

सोशल मीडियावरही बाप्पाचं स्वागत होतंय. विविध संदेशांचा वर्षाव सोशल मीडिया आणि व्हॉट्स अॅपवर होतोय. 

पाहा त्यातील खास मॅसेज -

* ''Wishing you and your family HAPPY GANESH PUJA. Happy Ganesh Chaturthi''

* तुमच्या आयुष्यातला आनंद 
त्या विघ्नहर्त् याच्या 
काना इतका विशाल असावा.. 
अडचणी उंदरा इतक्या 
लहान असाव्यात.. 
आयुष्य त्याच्या सोंडे इतके 
लांब असावे 
आणी 
आयुष्यातले क्षण मोदका प्रमाणे 
गोड असावेत.. 

।|गणेशोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा|।

* गणपती बाप्पा मोरया!:
आजपासून सुरू होणा-या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा....बुद्धीची देवता असलेला गणपतीराया आपणा सर्वांना सुख,समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,अशी त्याच्या चरणी प्रार्थना.

* ॥ गणपती बाप्पा मोरया ॥
दगडातच देव पाहतात लोकं ।
दगडालाच फुलं वाहतात लोकं ।।धृ।।

दगडाला फोडण्या मायेचा पाझर ।
दगडाला न्हाऊ घालतात लोक ।।1।।

दगडाला पेढे, दगडा भोवती वेढे ।
दगडावर दही दुध सांडतात लोकं ।।2।।

ज्याचा त्याचा आपला वेगळा दगड ।
दगडापायी ईथे भांडतात लोकं ।।3।।

दगडाची पुजा, दगडाचीच भक्ति ।
दगडापुढे टेकून वाकतात लोक ।।4।।

माणसातली माणूसकी भले उघडी ।
दगडाशी मात्र ईमान राखतात लोक ।।5।।

दगडाला शेंदूर, दगडाचे मंदिर।
दगडाचे ओझे वाहतात लोकं 
।।6।।
दगडाची वस्ती, दगडाचे काळीज ।
दगडाचेच ईथे राहतात लोकं⁠ ।।7।।

विचार -संत गाडगे महाराज

* चला उठा आणि बोला
गणपती बाप्पा मोरया

* गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक 
शुभेच्छा....
॥गणपती बाप्पा मोरया॥

आणखी वाचा  - सचिन तेंडुलकर कुटुंबासह लालबाग राजाच्या चरणी

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.