‘रिम’ झाली ब्लॅकबेरी; ब्लॅकबेरी – १० लॉन्च!

‘ब्लॅकबेरी’ मोबाईल हॅन्डसेट बनवणाऱ्या ‘रिसर्च इन मोशन’ म्हणजेच ‘रिम’ या कंपनीनं आपलं नाव बदलून आता ‘ब्लॅकबेरी’ हेच नाव धारण केलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 31, 2013, 11:55 AM IST

www.24taas.com, न्यूयॉर्क
‘ब्लॅकबेरी’ मोबाईल हॅन्डसेट बनवणाऱ्या ‘रिसर्च इन मोशन’ म्हणजेच ‘रिम’ या कंपनीनं आपलं नाव बदलून आता ‘ब्लॅकबेरी’ हेच नाव धारण केलंय. सोबतच, या मुहूर्तावर कंपनीनं गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेलं ऑपरेटींग सिस्टम ‘ब्लॅकबेरी-१०’ देखील लॉन्च केलंय.
‘अॅपल’ आणि ‘अॅन्ड्रॉइड’सारख्या फोनला टक्कर देण्यासाठी ब्लॅकबेरीचा हा अखेरचा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येतंय. ‘ब्लॅकबेरी-10’ जगभरातल्या मुख्य शहरांमध्ये लॉन्च करण्यात आलंय. यामध्ये नवी दिल्ली, लंडन, पॅरिस, जोहान्सबर्ग, टोरंटो, जकार्ता आणि दुबईसारख्या शहरांचा समावेस आहे. कंपनीनं ‘झेड-१०’ आणि ‘क्यू-१०’ हे दोन मोबाईल लवकरच लॉन्च करण्यात येईल, असं आश्वासनही दिलंय.

एक नजर टाकूया ‘ब्लॅकबेरी-१०’च्या खासियतवर...
 अत्याधुनिक ऑपरेटींग सिस्टम
 आयफोन, अँड्रॉइड आणि विंडोजच्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करू शकतो
 नवीन इन्टरफेस
 नवीन टच कि-बोर्ड
 फास्ट ब्राऊजर
 मल्टिटास्कींग ब्राऊजर