सॅमसंगचा नवा मोबाईल गॅलॅक्सी ग्रँड-२ लॉन्च

सॅमसंगनं मुंबईत गॅलॅक्सी ग्रँड-२ लॉन्च केला. गॅलॅक्सी ग्रँड २ जानेवारीच्य़ा पहिल्या आठवड्यात मार्केटमध्ये विक्रीस उपलब्ध होईल. या फोनची किंमत २२,९०० ते २४,९०० रुपयांदरम्यान असेल.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 24, 2013, 09:04 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सॅमसंगनं मुंबईत गॅलॅक्सी ग्रँड लॉन्च केला. गॅलॅक्सी ग्रँड २ डोस जानेवारीच्य़ा पहिल्या आठवड्यात मार्केटमध्ये विक्रीस उपलब्ध होईल. या फोनची किंमत २२,९०० ते २४,९०० रुपयांदरम्यान असेल.
गॅलॅक्सी ग्रँड या लोकप्रिय फोनच्या सीरिजमधला पुढचा असलेल्या या ग्रँड २ HD चा लुकही तितकाच शानदार आहे. या फोनवर एकावेळी अनेक कामं करता येणार आहेत. या फोनवर मनोरंजनाचीही अनेक साधनं आहेत... या फोनमध्ये नवा मल्टीविंडोचाही ऑप्शन आहे. हा फोन तीन कलरमध्ये उपलब्ध आहेत. काळा, पिंक आणि व्हाईटमध्ये हा मोबाईल असेल.
सॅमसंग ग्रँड २ हे मॉडेल सॅमसंगच्या ग्रँडची पुढची आवृत्ती आहे. गॅलेक्सी ग्रँड २मध्ये ८ मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा असून १.९ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये १.५ जीबीचा रॅम आहे. बॅटरी बॅकअपही पहिल्यापेक्षा चांगली आहे. त्याचबरोबर गॅलेक्सी ग्रँड २मध्ये नवे फिचर्स आहेत. ड्यूएल सिम असणारा हा हॅण्डसेट नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच बाजारात उपलब्ध होईल.
अँड्रॉईल ४.३ जेलीबीन असलेला या गॅलेक्सी ग्रँड२मध्ये ५.२ इंचची मोठी एचडी टीएफटी स्क्रीन आहे, ज्याचं रिझॉल्युशन ७२०x१२८० पिक्सेल आहे. फोनमध्ये १.५ जीबीचा रॅम आहे. बॅटरी बॅकअपही पहिल्यापेक्षा चांगली आहे. त्याचबरोबर गॅलेक्सी ग्रँड २मध्ये नवे फिचर्स आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.