ही पाहा पाण्यावर चालणारी कार

`द क्वाडस्की` ही कार पुढील महिन्यात अमेरिकेत उपलब्ध होणार आहे. ही एक एंफिबियस गाडी असून, ती रस्त्यावर तसेच पाण्यातही पळू शकणार आहे.

Updated: Oct 17, 2012, 04:56 PM IST

www.24taas.com, ऑकलंड
`द क्वाडस्की` ही कार पुढील महिन्यात अमेरिकेत उपलब्ध होणार आहे. ही एक एंफिबियस गाडी असून, ती रस्त्यावर तसेच पाण्यातही पळू शकणार आहे.
या कारच्या संशोधनासाठी व निर्मितीसाठी कंपनीला १८ वर्ष लागली आणि त्यासाठी २०० मिलियन डॉलर खर्च आला आहे. एवढेच नाही तर यासाठी तब्बल ३०० पेटेंट घेण्यात आली आहेत.

पाच सेकंदात प्रोप्लशन सिस्टममध्ये- ही आकाराने छोटी कार असून ती बाईक कार प्रकारात मोडते. रस्त्यावर चाकाच्या मदतीने चालणारी ही बाइक कार पाण्यात मरीन जेट प्रोप्लशन सिस्टमवर चालणार आहे. ही कार पाण्यात जाताच पाच सेकंदात चाके बंद होतील. तसेच ही कार पाण्यात दोन तास चालू शकते.