www.24taas.com, लंडन
खगोलशास्त्रज्ञांच्या एका समुहानं नव्या ग्रहाचा शोध लावलाय. हा ग्रह पृथ्वीपेक्षा सहापट मोठा आहे शिवाय या ग्रहाच्या भोवती चार सूर्य घिरट्या घालतानाही आढळलेत. हा आणखी एक चमत्कारचं असल्याचं म्हटलं जातंय.
पृथ्वीच्या कक्षेपासून पाच हजार प्रकाश वर्ष लांब असलेल्या या ग्रहाच्या चार बाजूंना दोन सूर्य प्रदक्षिणा घालत आहेत तर दुसऱ्या बाजूला हा ग्रह स्वतःच दोन सूर्यांभोवती प्रदक्षिणा घालताना आढळलाय. शोध लावलेला ग्रह तसेच त्याच्याभोवती असलेले चार सूर्य यांना ‘केआईसी ४८६२६२५’ असं नाव देण्यात आलंय.
अमेरिकेच्या दोन खगोलशास्त्रज्ञांनी प्लॅनेट हंटर्स परियोजनेअंतर्गत ‘याले विश्वविद्यालय टिम’च्या नेतृत्वाखाली या ग्रहाचा शोध लावलाय. ‘पीएच १’ नावाचा हा ग्रह गॅसचा विशाल गोळा आहे. तो नेप्चून ग्रहाच्या तुलनेत थोडा मोठा आणि पृथ्वीपेक्षा ६.२ पटीनं मोठा आहे. दोन सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी या ग्रहाला १३८ दिवसांचा कालावधी लागतो. हे दोन सूर्य एकमेकांभोवतीची परिकमा २० दिवसांत पूर्ण करतात.
इतर दोन सूर्य आणि या ग्रहामधलं अंतर हे पृथ्वी आणि सूर्यामधल्या अंतरापेक्षा एक हजारपट जास्त आहे. ‘पीएच १’ चे ग्रहाचे कमीतकमी तापमान २५१ डिग्री सेल्सिअस तर जास्तीतजास्त तापमान ३४० डिग्री सेल्सिअस इतक आहे. ग्रहावरचे तापमान मनुष्य, प्राणी यांच्यासाठी कुठल्याही परिस्थित अनुकूल नसल्याचं या शास्त्रज्ज्ञांनी स्पष्ट केलंय.