www.24taas.com, नवी दिल्ली
फेसबुक मॅसेंजरच्या माध्यमातून आपल्या सेलिब्रेटी मित्रांना मॅसेज पाठविणाऱ्यासाठी एक वाईट बातमी आहे. कारण की सोशल नेटवर्किंग साईटमध्ये असणारी सगळ्यात मोठी वेबसाईट फेसबुकने आपल्या युजर्सवर आता चार्ज लावण्याची तयारी सुरू केली आहे.
फेसबुक अशा उपभोक्तावर चार्ज लावणार आहेत, की कोणत्या सेलिब्रेटीला फॉलो करीत आहेत. किंवा त्यांच्या संपर्कात आहेत. आणि जो उपभोक्ता त्यांना मॅसेज करीत असल्यास त्याला त्या सेलिब्रेटीला मॅसेज करण्यातसाठी पैसे मोजावे लागणार आहे. मात्र इतर सामान्यांना युजर्स मॅसेज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा चार्ज लागणार नाही.
फेसबुक प्रवक्ताने स्पष्ट केले की, या नव्या सिस्टमने युजर्स स्पॅम मॅसेजपासून नक्कीच सुटका मिळेल. मात्र जर उपभोक्ता इतर मित्रांमार्फत इतर लोकांना मॅसेज करीत असल्यास त्याला यासाठी पैसे मोजावे लागणार आहे.