पिंपरी-चिंचवडमध्ये ई-कचऱ्याचा प्रश्न गंभीर

पर्यावरणाच्या दृष्टिने अत्यंत घातक असलेल्या ई-कचऱ्याचं पिंपरी चिंचवड मध्ये व्यवस्थापनाच केल जात नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. देशामध्ये ई-कचरा निर्माण करणा-या पहिल्या दहा शहरांमध्ये पुण्याचा समावेश आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 20, 2013, 09:25 PM IST

www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
पर्यावरणाच्या दृष्टिने अत्यंत घातक असलेल्या ई-कचऱ्याचं पिंपरी चिंचवड मध्ये व्यवस्थापनाच केल जात नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. देशामध्ये ई-कचरा निर्माण करणा-या पहिल्या दहा शहरांमध्ये पुण्याचा समावेश आहे.
पिंपरी-चिंचवड मधला औद्योगिक भाग ई-कचरा निर्मितीत आघाडीवर असताना महापालिकेला याबाबत गंभीर नसल्याची बाब समोर येत आहे. पेन्सिल सेल, कॉम्प्युटरचे पार्ट, बॅटरी, मोबाईलचा प्रचंड कचरा जमा होतोय.
विशेष म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेन ई-कचरा व्यवस्थापनासाठी ५ एकर जागा ३० वर्षांच्या करारान एका कंपनीला दिलीय. मात्र कंपनी हे काम करत नसल्याच समोर आलंय. त्यामुळ याप्रकरणी दोषी असणा-या अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.