www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरु
देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसच्या संचालक मंडळात मोठे फेरबदल करण्यात आले आहे. नारायणमूर्ती यांनी 14 जूनला पदभार सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
डॉ. विशाल सिक्का यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालकपदी (एमडी) निवड करण्यात आली आहे. तर इन्फोसिसचे संस्थापक असलेले नारायणमूर्ती 14 जूनला आपला पदभार सोडणार आहेत. मूर्ती यांनी जून 2013 मध्ये निवृत्ती घेतली असली ते संचालक मंडळावर होते.
नारायणमूर्ती यांचे पुत्र रोहन मूर्ती हे सुद्धा आपले पद सोडणार आहेत. त्यामुळे या पदावर प्रथमच बाहेरील व्यक्तीची निवड झाली आहेत. टाटा आणि कॉग्निझंट या कंपन्यांच्या तुलनेत इन्फोसिसची घसरण झाल्याने हे मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.
विशाल सिक्का एक जुलैपासून आपला पदभार स्वीकारणार आहेत. सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले एस. डी. शिबुलाल यांची जागा सिक्का घेणार आहेत. नारायणमूर्तींसह एस. गोपाळकृष्णन हेही उपाध्यक्षपदावरून पायउतार होणार आहेत, असे इन्फोसिसने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.