`सॅमसंग एस 5` मोबाईलमध्ये नवीन काय?

मोबाईल वर्ल्ड काँग्रेस सध्या स्पेनमधील बार्सिलोनात सुरू आहे, या निमित्ताने सॅमसंगने आपला बहुचर्चित एस 5 जगासमोर आणला आहे.

Updated: Feb 26, 2014, 04:30 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, बार्सिलोना
मोबाईल वर्ल्ड काँग्रेस सध्या स्पेनमधील बार्सिलोनात सुरू आहे, या निमित्ताने सॅमसंगने आपला बहुचर्चित एस 5 जगासमोर आणला आहे.
कंपनीने केलेल्या दाव्यानुसार एस 5 चा कॅमेरा आधीपेक्षा अधिक उत्कृष्ट आहे. ऍप्पलने फिंगर प्रिंट तंत्रज्ञान आणलंय, म्हणून सॅमसंगनेही एस5 मध्ये फिंगर प्रिंट तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
सॅमसंग एस5 ची बॅटरी इतर स्मार्टफोनपेक्षा जास्त काळ चालणारी आहे असा दावा, सॅमसंगचे उपाध्यक्ष जीन डेनियल अयम यांनी केलाय.
कारण पावर सेव्हिंग मोडमध्ये या फोनचा डिस्प्ले ब्लॅक अॅण्ड व्हाइट होतो, यानंतर फक्त कॉलिंग आणि मेसेजिंग सुरू राहतं.
सॅमसंग एस5 विषयी प्राथमिक फिडबॅक
नवीन गॅलेक्सी अधिक वेगवान वाटतो, याची स्क्रिनही मोठी आहे आणि मागील मॉडेलच्या तुलनेत याचं वजनही जरा कमी वाटतंय.
सर्वात मोठा फरक हा आहे की, यात १६ मेगा पिक्सेलचा कॅमेरा आहे, हा फोन एस 4 च्या कॅमेरापेक्षा अधिक उत्कृष्ट काम करतो. एस 5 गॅलेक्सी हा एस 4 चं अपडेटेड व्हर्जन वाटतो.
फिंगर प्रिन्टवाला हा पहिला मोबाईल फोन नाही, पण या बाबतीत सॅमसंगने गुणवत्ता सुधारली आहे. १६ मेगापिक्सेल कॅमेऱ्यांचा रिझल्ट पाहणं अजून बाकी आहे.
हार्टरेट मॉनिटर आणि फिंगरप्रिंट सेंसर हे जरा वेगळं वाटत असलं, तरी यातील दुसरे अतिरिक्त फीचर भविष्यात महत्वाचे वाटतात.
जर तुम्ही अशा फोनच्या शोधात असाल की, तो फोन स्मार्टफोनची परिभाषा बदलून टाकेल, स्मार्टफोनच्या जगात तो फोन एक वेगळं पाऊल ठरेल, मैलाचा दगड ठरेल, असं तुम्हाला वाटत असेल, तर तुमच्या हाती निराशा लागू शकते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.